आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधेरी पोटनिवडणूक:48 हजारांचे पाणी, 64 हजारांचे वडापाव, 1.42 लाखाचा चहा, उद्धवसेनेने वाटले 51 हजारांचे वडापाव

महेश जोशी | औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धवसेनेने वाटले ५१ हजारांचे वडापाव {सात उमेदवारांचा १२.९६ लाखांचा खर्च {पैकी एकट्या लटकेंचा खर्च ७.८३ लाख

मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात १७ दिवसांमध्ये सर्व ७ उमेदवारांना मिळून अवघा १२.९६ लाख रुपयांचा खर्च आला. यात एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सर्वाधिक ७.८३ लाख खर्च केले. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी ४८ हजार रुपयांचे पाणी प्यायले, ६२ हजारांचे वडापाव खाल्ले तर १.४२ लाख रुपयांच्या चहाचा आस्वाद घेतला. पैकी सर्वाधिक ५१ हजार रुपयांचे ३९५६ वडापाव उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटण्यात आले.

राज्यातील सत्तांतरानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघात झालेल्या पहिल्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात ऋतुजा लटके यांच्यासह ७ उमेदवार होते. पोटनिवडणुकीत गेल्या १५ वर्षांतील नीचांकी अवघे ३१.७४ टक्के मतदान झाले. एकाही मोेठ्या पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याने प्रचारासाठी अत्यल्प खर्च आला. पैैकी मोठा खर्च उमेदवारांचे चहा-पाणी आणि वडापाववर झाला. उमेेदवारांनी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या खर्चाच्या विवरणातून ही बाब समोर आली.

सर्वाधिक वडापाव उद्धवसेनेचे : एकूण खर्चाच्या १२,९६,६८६ पैकी ७,८३,२२० म्हणजे ६०% खर्च उद्धव सेनेच्या ऋतुजा लटके यांनी केला. त्यांनी ३९५६ वडापाववर ५१,४३० रुपये, चहाच्या १०,४९५ कपांवर १२,५९४ रुपये, तर पाण्याच्या ४४०५ बाटल्यांवर ४४०५० रुपये खर्च केले. त्यांनी ७००० रुपयांची ८ किलो बिर्याणी आणि ६८० रुपयांचे दीड किलो पेढेही विकत घेतले. महायुतीच्या उमेदवार असल्याने लटके यांना काँग्रेसच्या झेंड्यांसाठी ११,६९५ तर राष्ट्रवादीच्या झेंड्यांवर ११,४८५ रुपये खर्च करावा लागला.

वडापाव भारी प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या अल्पोपाहार, चहापाणी आणि जेवणाची जबाबदारी संबंधित उमेदवाराला करावी लागते. निवडणूक आयोगाने पाण्याची बाटली १०, चहा १२ तर वडापावचे १३ रुपये दर निश्चित केले होते. १४ ते ३० ऑक्टोबर या १७ दिवसांत उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या विवरणानुसार ७ उमेदवांरानी मिळून १२,९६,६८७ रुपये खर्च केले. पैकी चहा, वडापाव आणि पाण्यावर २,५३,१५० रुपये खर्च झाला.

बातम्या आणखी आहेत...