आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:150 फुटांवरून पडतो विलोभनीय जलप्रपात, 100 फूट उंच मनोऱ्यावरून पर्यटक लुटतात आनंद

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी आवाहन : गर्दी करताना जपून. ‘काेराेना’ अद्याप संपलेला नाही !

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर किनवट तालुक्यातील इस्लापूरपासून तीन किलोमीटरवर वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने १४ जूनपासून खळाळून वाहू लागला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे पर्यटकांना हा आनंद लुटण्यासाठी जाता आले नव्हते.

यंदा मात्र नांदेड जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्याने पर्यटकांना सहस्रकुंड धबधब्याचे विलोभनीय दृश्य पाहण्याची चांगली संधी आहे. धबधब्याचे पर्यटन क्षेत्र म्हणून सहस्रकुंड ओळखले जाते. जून महिन्यातील पावसाने पैनगंगा नदी वाहू लागल्याने नदीवरील मुरली बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आले आहेत. त्यातच १४ रोजी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने नाले भरून वाहत आहेत. या ओढ्याचे पाणी नदीत मिसळून वाहिल्याने हा धबधबा असा मनसोक्त खळाळून वाहतो.

दरवर्षी जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली की वाहणारा हा धबधबा डिसेंबरपर्यंत असाच मनसोक्त वाहत राहतो. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नांदेडसह पुणे, मुंबई येथून पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात.

बातम्या आणखी आहेत...