आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्ज:शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजाच्या पैशातून चहा पिण्यात आम्हाला रस नाही : थोरात

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजाच्या पैशातून विविध कार्यकारी सोसायट्यांचे अर्थकारण चालते. पण त्या व्याजाच्या पैशातून संचालक मंडळ, चेअरमन हौसमौज करीत असतील थर संस्था तोट्यात जातात. म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजाच्या पैशातून चहापाणी पिण्यात आम्हाला रस नाही. आम्हाला आरबी सोसायटी टिकवायची आहे. सहकार संस्था चालवणारे जर चांगले असतील तर सहकार टिकतो आणि सहकार चालणारे तर चांगले नसतील तर सहकार बुडतो हा इतिहास आहे, असे प्रतिपादन कृषिभूषण भाऊसाहेब थोरात यांनी गुरुवारी केले. कन्नड तालुक्यातील १८ गावांतील सभासद असलेल्या सर्वात मोठ्या औराळा रुरल को-ऑपरेटिव्ह बँक (आरबी) सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचाराची सुरुवात गुरुवारी श्रीलक्ष्मीदेवीच्या मंदिरात श्रीफळ फोडून करण्यात आली. या वेळी औराळीचे माजी सरपंच भारत निकम, वाल्मीक काकडे, शिवाजी बचाटे यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन गायके यांनी सूत्रसंचालन, शिवाजी बचाटे यांनी प्रास्ताविक, तर संतोष निकम यांनी आभार मानले. या वेळी जगन्नाथ कवडे, सुदाम नलावडे, शेषराव निकम, योगेश कवडे, कृष्णा बोरसे, जयेश बोरसे, अण्णासाहेब निकम, वाल्मीक व्होलप, गणेश निकम, अप्पासाहेब गायके, गणेश गायके, सुभाष बोरसे, गोरख काकडे, मधुकर नलावडे, रमेश गायके, इंदरचंद सत्तावन, राजू बोंगाणे, मथुराबाई निकम, सुभद्राबाई बचाटे, भाऊसाहेब सोनवणे आदी उपस्थित होते. मनोगत व्यक्त केले. सचिन गायके यांनी सूत्रसंचालन, शिवाजी बचाटे यांनी प्रास्ताविक, तर संतोष निकम यांनी आभार मानले. या वेळी जगन्नाथ कवडे, सुदाम नलावडे, शेषराव निकम, योगेश कवडे, कृष्णा बोरसे, जयेश बोरसे, अण्णासाहेब निकम, वाल्मीक व्होलप, गणेश निकम, अप्पासाहेब गायके, गणेश गायके, सुभाष बोरसे, गोरख काकडे, मधुकर नलावडे, रमेश गायके, इंदरचंद सत्तावन, राजू बोंगाणे, मथुराबाई निकम, सुभद्राबाई बचाटे, भाऊसाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...