आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:विद्यापीठ विभाजनाविरोधात नामांतर आंदोलनाच्या धर्तीवर आंदोलन करू ; आंबेडकरवादी संघर्ष समितीचे निवेदन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभाजनाविरोधात विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांनी आक्रमक भूमिका घेत विद्यापीठ विभाजनाबाबत शासनाने भूमिका जाहीर करावी, अन्यथा नामांतर आंदोलनाच्या धर्तीवर आंदोलन उभे करू, असा इशारा आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना दिला. या वेळी समितीतर्फे कुलगुरूंमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संजय निंबाळकरांची व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदावरून हकालपट्टी करावी, उच्च शिक्षण सहसचिव प्रकाश बच्छाव यांची समिती बरखास्त करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी श्रावण गायकवाड, विजय खंडागळे, श्रीरंग ससाणे, भागत भालेराव, आनंद कस्तुरे, शमीभा पाटील, बाळू गंगावणे, वसंत वक्ते, सचिन निकम, बलराज दाभाडे, नानासाहेब म्हस्के, बाळू वाघमारे, गुणरत्न सोनवणे, दीपक निकाळजे, शैलेंद्र मिसाळ, राहुल वडमारे, पवन पवार, नवल सूर्यवंशी, मनीष नरवडे, अॅड. अतुल कांबळे, अतुल खरात, राहुल मकासरे, विकास रोडे, स्वप्निल शिरसाठ, सिद्धार्थ मोरे, भागवत चोपडे, संदीप तुपसमुद्रे, लोकेश कांबळे, अमोल खरात, विजय जाधव, कैलास काळे, अमोल होर्शीळ, अजय गाडे, अमोल भालेराव, सचिन तिवारी, किरण तुपे, क्षितिज नितनवरे, शैलेश लांडगे, जयश्री शिर्के, हेमंत खोतकर, संजय म्हस्के, गौतम भिसे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...