आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९८५-८६ मध्ये शिवसेनेने औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या विरोधात पहिले पाऊल ठेवले. तेव्हापासून शहर काँग्रेसला उतरती कळा लागली. ती अजूनही कायम आहे. काँग्रेसला आलेली मरगळ ट्वेंटी-ट्वेंटी खेळून दोन महिन्यांत बदलून टाकू, असा दावा नवे शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी सोमवारी (२५ जुलै) केला. औरंगाबादेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. औरंगाबादच्या नामकरणात शिवसेना-एमआयएमने सुरू केलेल्या वादात अडकू नका, असा जाहीर सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिला.
शहर नामांतरावरून हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिल्यावर शेख यांची नियुक्ती झाली. त्यांचा गांधी भवनात पदग्रहण समारंभ झाला. या वेळी जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, सेवा दलाचे राज्याध्यक्ष विलास औताडे, माजी मंत्री अनिल पटेल शेख, माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, माजी महापौर अशोक सायन्ना, प्रदेश पदाधिकारी सरोज मसलगे, महिला आघाडी शहराध्यक्ष अंजली वडजे, डाॅ. पवन डोंगरे आदींची उपस्थिती होती.
जोरदार शक्तिप्रदर्शनानंतर शेख म्हणाले की, मी वॉर्डात जाऊन बैठका घेऊन महिनाभरात कार्यकारिणी तयार करेल. नगरसेवकाची उमेदवारी याच बैठकांतून ठरेल. मी राजेंद्र दर्डांसोबत निवडणुकीचे काम केल्याने मला शहराची सर्व माहिती आहे. पटेल म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शेख यांच्या रूपाने योग्य व्यक्तीची निवड केली आहे. दर्डांसह जुने लोक एकत्र आले तर काँग्रेस मजबूत बनेल. डाॅ. काळे यांनी गांधी भवनाऐवजी वॉर्डात बैठका घेण्याचा तसेच संभाजीनगर नामकरणामध्ये शिवसेना-एमआयएमच्या वादात न अडकता काम करा, असा सल्ला दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.