आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​नामांतराचा वाद:छत्रपती संभाजीनगरला जे विराेध करतील त्यांना आम्ही धडा शिकवू

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील राजकारणासाठी विरोध करत आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. जो कुणी विरोध करेल त्याला आम्ही धडा शिकवू, असा इशारा सकल हिंदू संघर्ष समितीच्या वतीने आयाेजित मेळाव्यात देण्यात आला. प्रशासनाला दहा लाख अर्ज पाठवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.सकल हिंदू संघर्ष समितीने मंगळवारी तापडिया नाट्यमंदिरात मेळावा घेतला.यात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती हाेती. होळी असल्याने खा. इम्तियाज यांच्या नावाने बोंबा मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

तुम्ही मुलाचे नाव आैरंगजेब ठेवत नाही : मुस्लिम समाजात कुणीही मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही, मग शहराच्या नावासाठी विरोध कशाला करता? अनेक वर्षांपासूनची नामांतराची मागणी पूर्ण झाली आहे. हा आनंदोत्सव साजरा व्हायला हवा. यात कुणी अडथळे आणत असेल तर मी तुमच्यासोबत आहे. जेथे गरज पडेल तेथे हजर राहीन, असे सहकारमंत्री अतुल सावे म्हणाले.

जगात दोनच छत्रपती : जगात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे दोनच राजे होऊन गेले. त्यांच्या इतिहासावर संशोधन होते. राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, युद्धात त्यांच्या शिकवणीची अंमलबजावणीकेली जाते. त्यांच्या नावाला आपल्याच शहरात विरोध करणे अयोग्य आहे. अशा वृत्तीला धडा शिकवणे गरजेचे असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले.

१९८५-८६ मध्ये आम्ही धडा शिकवला होता १९८५-८६ मध्ये आम्ही विरोध करणाऱ्यांना धडा शिकवला होता. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. मोठा मोर्चा काढावा लागणार आहे. तयारीला लागा, असा इशारा आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिला.

होलिकाेत्सवात औरंगजेबाचे पोस्टर व पुतळ्याचे दहन भारतीय जनता पक्ष अनुसूचित मोर्चाच्या वतीने त्रिमूर्ती चौकातील होलिकाेत्सवात आैरंगजेबाचे पाेस्टर व पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, जालिंदर शेंडगे आदी उपस्थित हाेते.

आमचे राज्य, आम्ही म्हणू तसेच होईल व वागावे लागेल निजामकाळात उर्दू शिकणे सक्तीचे होते. मंत्री अतुल सावे यांचे वडील त्यामुळे उर्दू शिकले व भाषणही चांगले करत होते. त्या वेळी त्यांचे राज्य होते. आता आपले राज्य आहे. आम्ही म्हणू तसेच होईल व वागावे लागेल. मी २२ दंगली पाहिलेला शिवसैनिक आहे. त्यामुळे सामाजिक शांतता भंग करू नका. तसेच प्रत्येकाने आपल्या घरावर छत्रपती संभाजीनगर नावाचा ध्वज फडकवावा, असे आवाहन आ. संजय शिरसाट यांनी केले.

घरोघरी जाऊन अर्ज भरण्याची मोहीम राबवली जाणार छत्रपती संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना मोर्चा काढण्यास परवानगी दिली तर आम्ही विशाल मोर्चा काढू. तुम्ही साडेतीन हजार अर्ज विरोधात पाठवले, आम्ही दहा लाख अर्ज समर्थनार्थ पाठवू. यासाठी घरोघरी जाऊन अर्ज भरून पाठवण्याची मोहीम राबवली जाईल. उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...