आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियातील श्रीमंतांनी गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला:सोने, जमिनीसारख्या पारंपरिक गुंतवणुकीत परतले आशिया खंडातील धनाढ्य लोक

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील वाढती महागाई आणि शेअर बाजारातील चढ-उतार पाहता भारतासह आशियातील श्रीमंतांनी गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला आहे. ते आता सोने-जमीन यासारख्या पारंपरिक गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे, ते शेअर बाजार आणि डिजिटल चलनापासून(क्रिप्टो) अंतर राखत आहेत. लोम्बार्ड ओडियरने ८ कोटी रु.हून जास्त गुंतवणूक केलेल्या व्यक्तींचा अभ्यास केला. त्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून श्रीमंतांनी स्टॉक, बाँड्स व क्रिप्टो वगळता स्वत:च्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणे सुरू केले आहे. लोम्बार्ड ओडियरचे आशिया प्रमुख विन्सेंट मॅग्नेटेट म्हणाले की, श्रीमंत गुंतवणूकदारांनी पारंपरिक, खासगी आणि सुरक्षित संपत्तीत गुंतवणूक करणे सुरू केले आहे. डिजिटल संपत्तीवर सर्वात कमी विश्वास आहे. ब्लूमबर्गनुसार, तंत्रज्ञान शेअर्समध्ये घसरण, वाढते व्याजदर आणि महागाईमुळे ५०० सर्वात श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ११२ लाख कोटी रु. घसरण आली .

६०% श्रीमंतांची खासगी संपत्तीत गुंतवणूक अभ्यासानुसार, ७७% गुंतवणूकदारांची सर्वात मोठी चिंता वाढत्या महागाईच्या परिणामापासून ते कसे वाचू शकतात ही आहे. यामुळे ते सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. ८३% गुंतवणूकदारांनी क्रिप्टोपासून अंतर राखले. जुन्या पिढीतील वा वयोवृद्ध गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी खासगी संपत्तीत गुंतवणूक वाढवत आहेत. त्यांना यात कमी जोखीम दिसत आहे. अशा श्रीमंतांची संख्या ६०% झाली आहे. ही संख्या गेल्या वर्षी जवळपास ५०% होती.

बातम्या आणखी आहेत...