आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:स्मृतिदिनानिमित्त चिकलठाणा येथील आठवडी बाजार; बिपिन अंभोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरजे व सिने एडिटर बिपिन अंभोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त चिकलठाणा येथील आठवडी बाजार स्मशानभूमीत मित्रपरिवारातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. बिपिन यांची कोलकाता येथील भारतातील द्वितीय क्रमांक असलेल्या प्रसिद्ध सत्यजित रे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सिने एडिटिंगच्या शैक्षणिक वर्षासाठी निवड झाली होती. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने ही पोकळी कधी न भरून निघणारी आहे, अशी भावना मित्रपरिवाराने व्यक्त केली.

त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी त्यांच्या मित्रपरिवाराने “बिपिन मोशन पिक्चर्स’या सिनेनिर्मिती करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. नव्या सिनेमाची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती लीला सुखदेव अंभोरे यांनी दिली. या वेळी बबन सोनवणे, बाजीराव सोनवणे, दिलीप मंजुळकर, पत्रकार भास्कर निकाळजे, सचिन ठोकळ, संदीप गवळी, नितीन अंभोरे, स्मशानजोगी लक्ष्मण पवार, गोविंद पवार आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...