आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडमध्ये गुन्हे वाढले:वजन मापे निरिक्षक ज्ञानेश्वर तांदळेंना दहा हजारांची लाच घेताना अटक; गुन्हा दाखल

कन्नड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड शहरातील वजन मापे निरिक्षक ज्ञानेश्वर किसनराव तांदळे (49) यांना दहा हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना पिशोर नाका येथील पांडे स्केअर येथे सोमवारी दुपारी एक वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका गॅस एजन्सी मधील इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा डिस्प्ले वजन मापे निरिक्षक ज्ञानेश्वर तांदळे यांनी ताब्यात घेतला होता. तो काटा व डिस्प्ले सोडविण्यासाठी तांदळे यांनी दहा हजाराच्या लाचेची मागणी 43 वर्षीय व्यक्तीकडे केली होती. त्या व्यक्तीने वजन व मापे कार्यालयाचे वर्ग 2 निरिक्षक ज्ञानेश्वर किसनराव तांदळे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

त्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक मारूती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक दिलीप साबळे यांनी पोलिस नाईक भिमराज जिवडे, दिगंबर पाठक, पोलिस अंमलदार चंद्रकांत शिंदे यांच्या सहकार्याने सापळा रजुन वजन मापे निरिक्षक ज्ञानेश्वर तांदळे यांना दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तांदळे यांच्या विरूद्ध कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीच्या डिकीतुन भामट्यांनी केले अडीच लाख लंपास

कन्नड तालुक्यातील भाबंरवाडी येथील ऊसतोड मुकदम दशरथ हारसिंग राठोड यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास एका खाजगी बँकेतुन काढून दुचाकीच्या डिकीत ठेवलेले अडीच लाख रुपये भामट्यांनी कन्नड बसस्थानक परिसरातुन लंपास केल्याची घटना सोमवारी एक वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी किं, दशरथ राठोड यांच्या मुलगा नारायण राठोड यांने पिशोर नाक्यावरील एचडीएफसी बँकेतुन ऊसतोड कामगारांना पैसे देण्यासाठी 2 लाख 50 हजार काढून दिले. ते अडीच लाख रुपये दशरथ राठोड यांनी घेऊन एम.एच. 20.सी.डी.2996 या दुचाकीच्या डिकीत ठेवले. आणि बाबु अनिल चव्हाण यांच्या सोबत बसस्थानक जवळच असलेल्या मनोज टेलरच्या दुकानात ते आले. बाबु चव्हाण हा मनोज टेलरच्या दुकानात बसला व दशरथ राठोड हे लघवीसाठी बसस्थानकात गेले

. तेथून आल्यानंतर ते दशरथ राठोड व बाबु चव्हाण हे दोघे पंचायत समितीजवळ गेले. तेथे गेल्यानंतर डिकीत पैसे आहेत की, नाही पाहावे म्हणून त्यांनी डिकी उघडून बघितली असता त्यांना डिकीत ठेवलेले पैसे दिसले नसल्याने त्यांनी लगेच नारायण राठोड याला कळवले. कन्नड शहर पोलीस ठाण्यात दशरथ राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता1860 नुसार 379 गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भुषण सोनार करत आहे.

बातम्या आणखी आहेत...