आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथाचे स्वागत:राजमाता जिजाऊ यांच्या अभिवादन रथाचे स्वागत ; जिजाऊ चौक, मुकुंदवाडी, क्रांती चौकात जल्लोष

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा येथून निघालेल्या राजमाता जिजाऊ अभिवादन रथयात्रेचे शहरातील केंब्रिज चाैकातील जिजाऊ प्रवेशद्वारावर जल्लाेषात स्वागत करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा व इतर शिवप्रेमींनी जिजाऊंच्या पुतळ्याचे औक्षण करून अभिवादन केले. यात महिलांची संख्या लक्षणीय हाेती.राजमाता जिजाऊंनी १७ जून १६७४ रोजी रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शिवप्रेमींनी यंदा प्रथमच अभिवादन यात्रा काढली आहे. यात्रेसोबत राजे लखोजीराजांचे वंशज शिवाजीराव जाधव यांच्यासह ३० पेक्षा अधिक जणांची वाहने आहेत. यात्रा १६ जून रोजी सुपा येथून शिक्रापूर, लोणीकंद, वाघोली, महाड, लाडवली येथे मुक्कामी थांबेल. १७ जून रोजी सकाळी पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीचे पवित्र जलाने पूजन केले जाणार आहे. औरंगाबादेत स्वागतास मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील, रविराज बोचरे पाटील, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, रेखा वाहटुळे, गीता कापुरे, सुवर्ण मोहिते, सुनीता भोसले, सुवर्णा तुपे, सुनंदा कालवणे, ललिता वल्ली, अशा साळवे, सुनीता पाटील, रवींद्र वाहटुळे, ज्ञानेश्वर अंभोरे, लक्ष्मी मस्के, मीनाक्षी पाटील, ओमसाई कदम, विकी पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...