आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैफलीत गायकांनी स्वर:स्वरप्रथम मैफलीने नववर्षाचे स्वागत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘सूर निरागस हो’, ‘कजरा मोहब्बतवाला’, ‘कुछ ना कहो’ सारखी रंगतदार गाणी, सुश्राव्य स्वर आणि गाण्यागणिक रसिकांचा टाळ्या, शिट्यांचा उदंड प्रतिसाद अशी संध्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगली. स्वरप्रथम आयोजित या मैफलीत गायकांनी स्वर चढवला होता. नववर्षाची स्वरमयी सुरुवात या मैफलीने केली.

शहरातील कलावंतांचा हा प्रयोग लक्षणीय ठरला. दीपक पवार यांच्या ‘सूर निरागस हो’ गीताने सुरू झालेली मैफल रंगतदार होत गेली. श्रुती कुलकर्णीने ‘सुनो सजना’, तर नंदिनी महाजन-दीपक यांच्या ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गीताने वातावरणात बहार आणली. प्रथमेश महाजनांच्या ‘कुछ ना कहो’ या हळुवार गीताने वन्समोअर मिळवला. या वेळी गायक प्रसाद साडेकर, गजानन केचे, सुभाष पळसकर, श्रीपाद पदे, वैभव पांडे, वर्षा जोशी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, संगीतकार अतुल दिवे, गायिका वैशाली कुर्तडीकर, गिटारिस्ट श्रीराज कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

नाना पाटेकर यांचा ‘कैसे बताऊं मैं तुम्हे...’ हा संवाद सुहास यांनी खास शैलीत सादर केला. आकांक्षा पिंपळे हिने रांगोळी रेखाटली. ऋषिकेश धर्माधिकारी ध्वनी तर छायाचित्रण सौरव सावळे यांनी केले. अमोघ केऱ्हाळकर, हर्षवर्धन हेलवाडे, खुशी, मंजिरी, प्रणव कुलकर्णी, समर्थ जोशी आदींनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...