आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी जिल्ह्यातील वालुरमध्ये बारव स्वचतेचे काम दहा दिवस करण्यात आले होते.गावातील दीडशे गावकऱ्यांनी एकत्र येत बारव संवर्धन समितीच्या मार्गदर्शन घेत ही बारव स्वच्छ केली. अष्टकोनी असणाऱ्या या बारव मध्ये सोमवारी रात्री दीपोत्सव करणयात आला. शेकडो दिव्यांनी ही बारव उजळून निघाली. हा दीपोत्सव डोळ्याचे पारणे फेडणारा होता.
परभणी जिल्ह्यातील मानवत पेडगाव जिंतूर कासापुरी यासह अनेक ठिकाणी बारव स्वच्छता काम सूरु आहे. मानवत मध्ये गेल्या 33 दिवसापासून युवक बारव स्वच्छ करणे त्यामधील गाळ काढण्याचे क करत आहेत. याच पद्धतीने सेलू तालुक्यातील वालुर गावात श्रमदानासाठी लोकांनी एकत्र येऊन स्वच्छता केली असल्याची माहिती वालुरचे सरपंच संजय साडेगावकर यांनी दिली आहे.
दिव्यांनी उजळून निघाली बारव
याबाबत बारव संवर्धन समितीचे मल्हारीकांत देशमुख यांनी सांगितले की बारव चे स्वच्छता गाळ काढल्यानंतर पाणी लागले. या पाण्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हा दीपोत्सव घेण्यात आला. यावेळी सेलूचे तहसीलदार यासह इतर अधिकारी उपस्थित होते.गावकऱ्यांनी केले ल्या मेहणीमुळे हा परिसर उजळून निघाला आणि हा दीपोत्सव डोळ्याचे पारणे फेडणारा होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.