आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुपारी साडेबाराची वेळ. शाळांनी गजबजलेला औरंगपुरा परिसर. शाळेच्या गेटमधून बाहेर पडणारे मुलांचे लोंढे आणि त्यांना घ्यायला आलेल्या पालकांची गर्दी. त्यापलीकडे रिक्षा, व्हॅन, स्कूल बसचा कल्ला. याचा गैरफायदा घेत शाळेच्या गेटपाशीच उभी टवाळखोरांची गँग. त्यातले काही जण मुलींकडे पाहून खुणावत होते, काही जण चक्क मोबाइलमध्ये त्यांचे फोटोही काढत होते. अश्लील कमेंट्स, पाठलाग हा तर नेहमीचाच. हटकलं तर अरेरावीची भाषा. दाटीवाटीने उभ्या गाड्या, आपापली रिक्षा, व्हॅन शोधणारे विद्यार्थी, समोरच्या टपऱ्यांवर हेटाळणी करणारी टोळकी...
शाळा परिसरात सीसीटीव्ही नाहीत : शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत, पण विद्यार्थी गेटबाहेर पडल्यावर पुढे काय होते हे बघण्यासाठी सीसीटीव्ही लावलेले नाहीत.
शाळा सुटल्यावर टवाळखोर येऊन थांबतात, जाब विचारला तर धमकी औरंगपुरा आणि चिकलठाणा परिसरात शाळा सुटल्यावर आणि शाळा भरतानाही टवाळखोर येऊन उभे राहतात. मधल्या सुटीत तर विद्यार्थिनी डबे खाण्यासाठी आल्यावर चकरा मारतात. बऱ्याच वेळा समजावून सांगितले तरी ऐकत नाहीत. पोलिसांना कळवले आहे. शिक्षकांनी जाब विचारल्यास अरेरावीची भाषाही होते .
शाळेच्या परिसरात ‘बर्थडे पार्टी?’, सुरक्षा रक्षकांसोबत अरेरावी नामांकित शाळांच्या समोर असलेल्या मोकळ्या परिसराचा वापर चक्क वाढदिवस साजला करण्यासाठी होतो. कॉलेज किंवा परिसरातील टवाळखोर मुले वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने येऊन गोंधळ घालतात. या मुलांना अडवण्याचा प्रयत्न केल्यावर धमक्या मिळतात. सुरक्षा रक्षकांसोबत अरेरावी केली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.