आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेना राज्यात थैमान घालत असताना राज्य सरकारचे निर्बंध धाब्यावर बसवून गर्दी जमवून शिवसेनेचे अामदार संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी वाळूज परिसरात सार्वजनिक कामाचे उद्घाटन केले हाेते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अाहे का, अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी साेमवारी प्रशासनाकडे केली. जर गुन्हा दाखल केला असेल तर काेणती कलमे लावली याची माहिती देण्याचे अादेशही खंडपीठाने दिले अाहेत. शहरात मास्क व हेल्मेटचा वापर होत आहे काय? जे लाेक या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर कुठली कारवाई करण्यात अाली, अशी विचारणाही न्यायालयाने केली अाहे.
दिव्य मराठी व इतर माध्यमांमध्ये काेराेनाविषयी अालेल्या वृत्तांची दखल घेऊन खंडपीठाने सुमाेटाे फाैजदारी याचिका दाखल करून घेतली अाहे. यापूर्वीच्या सुनावणीत खंडपीठाने नियम न पाळणाऱ्या नागरिकांना चांगलेच सुनावले हाेते. तसेच रेमडेसिविरचा काळाबाजार व इतर सुविधांसाठी प्रशासनाला जाब विचारला. साेमवारी कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांकडून उपाययाेजनांची माहिती खंडपीठाने मागवली अाहे.
अामदार संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाचे निर्बंध डावलून आमदार निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन केले हाेते. त्याचीही न्यायालयाने गंभीर दखल घेतली. “शहरात कोरोनामुळे राेज २५ पेक्षा जास्त नागरिक आपला प्राण गमावत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या माेेठ्या प्रमाणावर निघत असताना गर्दी जमवणाऱ्या शिरसाट यांच्यावर काेणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले अाहेत?’ अशी विचारणा करण्यात अाली.
बारा जिल्ह्यात नाही विद्युत किंवा गॅसदाहिनी
मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने विद्युतदाहिनीसाठी सर्वच शहरांत कृती अाराखडा तयार करण्याचे अादेश दिले हाेते. साेमवारी न्यायालयाने म्हटले की, पर्यावरणाचा विचार केल्यास विद्युत अथवा गॅसदाहिनी ही काळाची गरज अाहे. खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील किती महापालिका, नगरपालिका, नगर परिषदांनी अशा दाहिनींची व्यवस्था केली, असा प्रश्नही न्यायालयाने केला. त्यावर एकाही जिल्ह्यात अशी सुविधा नसल्याचे समाेर अाले. त्यावर न्यायालयाने १२ जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले अाहेत.
चार कलमान्वये गुन्हा
शिरसाट यांनी २५ एप्रिल रोजी कार्यक्रमासाठी गर्दी जमवली होती. याप्रकरणी त्यांच्यासह ४० जणांवर २६ एिप्रल रोजी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कलम २६९, २७०, १८८, १३५ नुसार हा गुन्हा नोंद झाला. यात आरोप सिद्ध झाल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षा हाेऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.