आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतील ताई जेव्हा मुलांना झाडवर चढ म्हणते..:माेबाईलमुळे खेळणं, बागडणं हरवलं; पाठ्यपुस्तकातील "सुरपारंबी खेळा'तून पुन्हा उभारी

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली दोन वर्ष शाळा बंद तर कधी सुरु होती. परंतु ऑनलाइन तास शाळेत नव्हे तर मोबाईलवर चालू होता. यामुळे बहुतांश मुलांमध्ये मोबाईलची सवय लागली. मुल एकलकोंडी झाली. हसणे, मैदानावर खेळणे, बागडणे मुले विसरली. या मुलांना पुन्हा शिक्षणाची गोडी लागावी, खेळणे स्पर्धेत सहभागी होणे देखील महत्त्वाच आहे. हाच आत्मविश्वास मुलांना परत मिळवून देण्याचे काम औरंगाबाद शहरातील देवळाई परिसरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदोनच्या जिल्हा परिषदेतील शिक्षक करत आहे.

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील बालसाहित्यिक बाबा भांड यांचा धडा गुणग्राहक राजा यातील ""सुरपारंबी खेळा' या माध्यमातून मुलांना त्यांचा आत्मविश्वास आणि एकसंघ होण्यासाठीचा आदर्श शाळेने निर्माण केला आहे.

मुले आपले पारंपारिक खेळ विसरले आहेत. त्यांना पुन्हा या पारंपारिक खेळाकडे वळवण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि खेळाून शिकण्याची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने इयत्ता चौथीच्या वर्गात मराठी पाठ्यपुस्तकात असलेल्या गुणग्राहक राजा या धड्यात असलेले "सुरपारंबी ' खेळामुळे गावातील गजानन माणिक आणि काळू रहीम यांच्यातील गुण हेरणारे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा हा बाबा भांड यांनी लिहिलेला धडा मुलांना आहे.

यात "सुरपारंबी खेळातून मुलांमध्ये निर्माण होणारा आत्मविश्वास, चपळता, तल्लख बुद्धीचा विकास करतो येवू शकतो. हे लक्षात घेवून शाळेत दर शनिवारी हा खेळ घेतला जात असल्याचे शिक्षिका संगीता चव्हाण यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले.

असा आहे "सुरपारंबी खेळा'

यात झाडाखाली मुलांना एकत्र केले जाते. एक मुलगा काठी लांब फेकतो तो दुसरा काठी शोधून घेवून येईपर्यंत दुसरा झाडावर सरसर चढतो. काठी रिंगणातू ठेवून तो झाडावर पुन्हा चढतो आणि गेलेल्या मुलाला पकडतो. दुसरा पुन्हा खाली येवून काठी फेकतो ती शोधून आणेपर्यंत पुन्हा उडी मारत झाडावर चढतो. यात पकापकडी आणि स्पर्धा, हारजीत, आत्मविश्वास, मुलांमध्ये असलेली चपळता, कौशल्य, एकसंघ होण्याची भावना या सर्व गोष्टी खेळात आहे. खेळात हारजीत महत्त्वाची नाही तर मुलांनी खेळण महत्त्वाच आहे असा हा "सुरपारंबी खेळा'

''मुलांच्या विकासासाठी इतर शाळांनी देखील पाठ्यपुस्तकातील धड्यांच्या आधारे मुलांना हसत-खेळत शिक्षण देण्याचे उपक्रम राबविणे आवश्यक आहे.''- जयश्री चव्हाण प्राथमिक शिक्षणाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...