आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:शाळा कधी सुरू कराव्यात तुम्हाला शाळेकडून काय अपेक्षा, पालकांकडून सूचना मागविण्याचे आदेश

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • शाळा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू करावी की, ऑक्टोबरमध्ये
  • मानस संस्थाधन विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाचे आदेश

शाळा कधी सुरु होतील या प्रतिक्षेत पालक आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या भितीमुळे पालक मुलांना शाळेत पाठवतील की नाही, ऑनलाइन शिक्षणावरही अनेक मत मतांतरे आहेत. या सर्व प्रकरात आता पालकांची नेमकी भूमिका आणि मत काय आहे. त्यांना नेमकी कधी शाळा सुरु करावी या विषयी काय वाटते आहे. यासंबंधी शाळांनी पालकांकडून सूचना मागवाव्यात तसेच पालकांना शाळेकडून काय अपेक्षा आहेत याची संपूर्ण माहिती घेवून कळविण्यात यावे असे आदेश मानव संसाधन विकास मंत्राल्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिले असून, सचिव राजेश संपले यांनी पत्राद्वारे सर्व शिक्षण सचिवांना कळवले आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भ वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा परीक्षा न घेताच शाळांना शैक्षणिक सत्र पूर्ण होण्यापूर्वीच मार्च मध्ये सुट्या देण्यात आल्या होत्या.तसेच विद्यार्थ्यांना सरासरी गुण देवून उत्तीर्ण करण्यात आले होते. मात्र मार्च ते मे महिन्यात संपूर्ण लॉकडाऊन असल्याने जून मध्ये तरी शाळा सुरु होतील अशी अपेक्ष होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळांमध्ये सोशल आणि फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे याबाबत सर्व खबरदारी पाळली जाईल की नाही यामुळे सर्व मुलांचे आरोग्य देखील सुरक्षित असले पाहिजे. याबाबत चिंता असल्याने शाळा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. आता तर जुलै महिना देखील संपत आला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अनेकांनी सुचवला तसे ऑनलाइन क्लासही शाळांनी सुरु केले.परंतु त्याचे दुषपरिणाम आणि अडचणी लक्षात घेता बालवर्ग ते दुसरीपर्यंत ऑनलाइन क्लास घेण्यात येवू नये. तसेच पालकांना ऑनलाइन क्लासच्या नावाखाली शुल्क वसूली करु नये याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु मुलांना त्यांच्या मानसिक आणि शारीरीक विकासानुसार शिक्षण मिळाले पाहिजे हा प्राथमिक शिक्षणाचा पहिला नियम आहे.

कृतीयुक्त शिक्षणातूनच मुले अधिक चांगले शिकू शकतात. यामुळे आता केंद्राच्या मानव संसाधन विकास मंत्राल्याच्या शिक्षण विभागाने सर्व शिक्षण सचिवांना आदेश देण्यात आले आहेत. की शाळांना देखील यात माहिती घ्यावी की पालकांना कोणत्या महिन्यात शाळा सुरु करावी ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोंबर २०२०. तसेच पालकांना शाळांकडून सुरु झाल्यावर काय अपेक्षा आहेत. याव्यतिरिक्त काही सूचना अथवा पर्याय सूचवायचे असेल तर ते  coordinationeel@gmail.com अथवा rsamplay.edu@nic.in या मेलवर पाठविण्यात यावे असेही पत्रात म्हटले आहे.