आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Where The Mother in law And The Mother in law Face Off, Where The Bride groom Is 'duty' As Soon As They Fall Ill, 1966 Gram Panchayat Voting In Marathwada

मराठवाड्यात 1966 ग्रामपंचायतीत मतदान:कुठे सासू-सुनेत रंगला सामना, तर कुठे अक्षता पडताच वधू-वर ‘कर्तव्या’ला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये १९७७ ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान पार पडले. एक, दाेन अपवाद वगळता सगळीकडे शांततेत ही प्रक्रिया झाली. अनेक ठिकाणी मतदारांनी महत्त्वाची कामे बाजूला ठेवून लाेकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदार केंद्रावर येत हाेते. हिंगाेलीतील सेनगाव तालुक्यात सासू-सून एकमेकांच्या समाेर उभे हाेते. तर केज तालुक्यात अक्षता पडताच नववधू व वर मतदान करण्यासाठी दाखल झाले. परभणीत राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाच्या पॅनलने एकमेकांविरुद्ध दंड थाेपटले. उस्मानाबादमध्ये प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्येही शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. २० डिसेंबर रोजी गावाचा कारभारी कोण यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

परभणी : सात ग्रा.पं.बिनविरोध

जिल्ह्यात १२० ग्रा.पं.साठी मतदान झाले. सात ग्रामपंचायती आधीच बिनविराेध झाल्या. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांचे पॅनल परस्पर विरोधात निवडणुकीसाठी रिंगणात होते. तर काही ठिकाणी परस्पर सामंजस्याने पॅनल उभे केले गेले होते.

हिंगाेली : ७० टक्के मतदान

जिल्ह्यात ६१ ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान झाले. आडगाव येथील मतदान केंद्रावर आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मतदान केले. तर सेनगाव तालुक्यात हाताळा येथे सासू-सून आमने-सामने होते. कळमनुरी तालुक्यात १६, हिंगोलीत १६, सेनगाव १०, औंढा नागनाथ ७ तर वसमत तालुक्यात १२ ग्रा.पं.साठी मतदान झाले.

जालना : ८२९ केंद्रांवर प्रक्रिया

२५४ ग्रामपंचायतींसाठी ८२९ केंद्रांवर मतदारांनी हक्क बजावला. ग्रामपंचायतींची एकूण संख्या २६६ असून यातून २६६ सरपंच व २१७८ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. यातील ३५३ सदस्य तर १७ सरपंचपदाची बिनविरोध निवड झाली. मंठा तालुक्यातील तळणी येथील राऊत कुटुंबातील दीपक या नवरदेवाने सकाळीच मतदान केले.

बातम्या आणखी आहेत...