आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात खा. इम्तियाज जलील यांचे आरोप:वाहने जळताना अधिकारी कुठे होते? अग्निशमन बंब लांब का थांबवला?

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामनवमीच्या मध्यरात्री किराडपुऱ्यातील राम मंदिरावर समाजकंटकांनी हल्ला केला. साडेतीन तास चाललेल्या दंगलीत मंदिर व आतील महिला, पोलिसांच्या सुरक्षेसाठी गोळीबाराशिवाय पर्याय उरला नाही. यात पोलिसांची १४ वाहने जाळली गेली. मात्र, तोपर्यंत इतर पोलिस अधिकारी कुठे होते, अग्निशमन विभागाचा बंब मध्येच का थांबवला, असे गंभीर प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले आहेत. या दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावे, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे केली आहे.

गुप्तचर यंत्रणा, तपास यंत्रणांकडून नामांतरानंतर शहरात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. रामनवमीदरम्यान त्याची परिणती संवेदनशील समजल्या जाणाऱ्या किराडपुऱ्यातील दंगलीत झाली. राजकीय टीका सुरू असताना आता खासदार इम्तियाज यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून पोलिसांनाच संशयाच्या घेऱ्यात उभे केले आहे. “या घटनेत मी स्वत: साक्षीदार आहे. मंदिरात केवळ १५ पोलिस होते.