आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदगाव:चिमुकल्या 3 लेकींसोबत रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत आई जागेवरच गतप्राण

नांदगाव / प्रमित आहेर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदगावी पावसामुळे तुंबला अंडरपास, पर्यायी मार्ग नसल्याने निष्पाप बळी

नवरात्रोत्सवामुळे देवीच्या दर्शनासाठी पहाटे साडेपाचला आपल्या तीन छोट्या लेकी व मैत्रिणीसह लगबगीने निघालेल्या महिलेचा रेल्वेच्या धडकेत जागेवरच मृत्यू झाला. दोन रेल्वे एकामागोमाग पास झाल्याने दुसरीकडून येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. स्वाती रवींद्र शिंदे असे या महिलेेचे नाव आहे.

पेट्रोलिंगसह गाडी आल्यावर आता सायरन वाजवणार : चाळीसगाव येथून रेल्वे पोलिस दलाचे अधिकारी आल्यावर त्यांनी अंडरपासमध्ये पाणी साचल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने लोहमार्ग ओलांडताना महिलेचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल करून घेतली व प्रबंधक मीणा यांनी नागरिकांच्या मागणीनुसार लोहमार्गालगत रहिवासी भागात रेल सुरक्षा दलाचे दोन जवान पेट्रोलिंग करतील. गाडी आल्यावर नागरिकांना सतर्क करण्यासाठी सायरन वाजवला जाईल. अंडरपासमधील पाणी उपसण्यासाठी चोवीस तास पंप चालवले जातील, असे लेखी दिल्यावर ठिय्या मागे घेण्यात आला. दुपारी तीन वाजता स्वाती यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पालिकेची संदिग्ध भूमिका अद्यापही कायम
अंडरपासचे काम चालू असताना तसेच बांधून तयार झाल्यावर रेल्वेचे इंजिनिअर पाण्याचा निचरा होण्यासाठी मटण मार्केट पाडण्याची मागणी करत आहे. याप्रकरणी मटण मार्केटमधील गाळेधारक आणि पालिका यांच्या खटल्याचा निकाल पालिकेच्या बाजूने लागला आहे परंतु पालिकेने न्यायालयाच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे नांदगाव पालिकेची याप्रकरणी संदिग्ध भूमिका अद्याप कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...