आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयद्रावक:वडिलांचे पार्थिव घरात असताना शोएबने सोडवला दहावीचा पेपर, कन्नड येथील घटना, पेपर सोडवून वडिलांवर अंत्यसंस्कार

कन्नड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून वडील अाजारी असल्याने मानसिक ताण हाेता. त्यातच दहावीचा सामाजिकशास्त्राचा भाग-२ चा पेपर काही तासांवर असताना वडिलांचे निधन झाले. पण अशा परिस्थितीतही न डगमगता, धीर न गमावता कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील शोएब पिंजारी हा पेपर सोडवून आला आणि नंतर वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोएबचे वडील रशीद पिंजारी हे गादी घर येथे मजूर होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारी पहाटेच त्यांचे निधन झाले. याच दिवशी त्यांचा मुलगा शोएबचा दहावीचा पेपर होता. पेपरला जाण्यापूर्वीच शोएबला नियतीच्या परीक्षेला सामोरे जावे लागले. वडिलांचा मृतदेह दारात असताना त्याने परीक्षेला महत्त्व दिले. शोएब पिंजारी याच्या कुटुंबातील सर्वजण हे गादी बनवण्याचे काम करतात. हाताला काम मिळाले तरच पोटाला भाकर अशी काही घराची परिस्थिती आहे.

परीक्षा केंद्र कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय
इयत्ता दहावीचे शिक्षण घेत असलेला शोएब याचे परीक्षा केंद्रही कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय होते. त्यामुळे पेपर देऊन त्याने घर जवळ केले. यानंतर कुटुंबीयांनी व गावातील नागरिकांनी रशीद पिंजारी यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...