आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवरासंगम:एकाला वाचवत असताना इतर तिघांचाही मृत्यू; चारही मृत वैजापूरचे, मढीला दर्शनास निघाले होते

नेवासे/गंगापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यातील मढी देवस्थान येथे दर्शनसाठी जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील (जि. छत्रपती संभाजीनगर) ४ तरुणांचा गोदावरी नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिर घाट येथे दुपारी घडली. बाबासाहेब अशोक गोरे (३५), नागेश दिलीप गोरे (२०), आकाश ऊर्फ अक्षय भागीनाथ गोरे (२०) व शंकर पारसनाथ घोडके (२२) अशी मृतांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह सापडले असून नागेशचा शोध सुरू आहे.

पालखेड येथून निघालेले ९ भाविक प्रवरासंगम येथे स्नान करून गोदावरीचे पवित्र पाणी घेऊन मढी येथे जाणार होते. दुपारी ४ वाजता ते मंदिराच्या घाटावरून पाण्यात उतरले. एक जण पाण्यात बुडत असल्याचे पाहताच इतर मित्रही त्याला वाचवायला धावले. परंतु दुर्दैवाने ४ जण बुडाले, गौरव बाळू गोरे सुखरूप पाण्याबाहेर आला.

रात्री उशिरापर्यंत अंधारात शोधमोहीम, ितघांचे मृतदेह सापडले गोदावरी नदीतील मासेमारी करणाऱ्या मच्छीमार लोकांनी मदतीसाठी बोलावण्यात आले. पोलिसांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाला तसेच आपत्कालीन मदत करणाऱ्या पथकालाही पाचारण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर व वैजापूर, गंगापूर येथूनही प्रशासकीय तसेच आपत्कालीन पथक मदतीला आले होते. सुमारे दोन तासानंतर पहिला मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यानंतर अर्ध्या तासात आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...