आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिल विजय दिवस विशेष:तिन्ही मुले कारगिल युद्धात असताना आई-वडिलांचा जीव होता टांगणीला

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: सतीश वैराळकर
  • कॉपी लिंक
  • श्रीनगरच्या दहशतवादी हल्ल्यात बचावला

१९९९ मध्ये कारगिल युद्धाचा भडका उडालेला हाेता. भारतीय हवाई दलाची विमाने शत्रूंवर तुटून पडली होती. पाकिस्तानी हल्ला परतावून लावण्यासाठी हवाई दलाला पूरक मदत करण्यासाठी वडगाव बुद्रुक (ता. भडगाव, जि. जळगाव) येथील तीन भावंडांना तैनात केले गेले. आपली मुले युद्धभूमीवर तैनात असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या आईवडिलांच्या जिवाची मात्र घालमेल सुरू झाली. भारताने विजयी पताका फडकावल्यानंतर मात्र आनंदाला उधाण आले. यशाची गुढी उभारून गावी परतलेल्या या भावंडांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.

तितूर नदीकाठावरील वडगाव बुद्रुक येथील वना पाटील यांची तीन मुले केशव, किशोर व दीपक देशसेवेसाठी हवाई दलाच्या तांत्रिक विभागात भरती झाली. कारगिल युद्धात केशव आणि किशोर यांना पाक सीमेवरील ओप्स लोकेशनवर पाठवले गेलेे. दीपकला पहिली पोस्टिंग १९९८ मध्ये बंगालमधील एअरबेसवर मिळाली होती. पण युद्ध काळात दीपक हाशिमारा एअरबेसवर होते.

आईवडिलांची चिंता वाढली
युद्ध सुरू असताना इकडे आईवडिलांची परिस्थिती मात्र कठीण होती. दीपकने आईवडिलांना मी युद्धावर जात आहे, वाट पाहू नये, असे पत्र लिहिले होते. युद्ध संपल्यावरच त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला! नंतर केशव यांची रशिया येथील प्रशिक्षणासाठी व विमानांच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन महिन्यांसाठी निवड झाली होती. ते आय एल ७६ या मालवाहू विमानावर १० वर्षे एअर क्रू म्हणून कार्यरत होते. किशोर यांनी मिग जातीच्या सर्व लढाऊ विमानांवर काम केले. केशव व किशोर यांनी २० वर्षांच्या सेवेनंतर सन २००४ व २००५ मध्ये निवृत्ती घेतली. दीपकनेही २०१६ मध्ये निवृत्ती घेतली.

श्रीनगरच्या दहशतवादी हल्ल्यात बचावला
प्रशिक्षणानंतर केशव यांची पहिली बदली श्रीनगर येथे झाली. त्या वेळेस काश्मीर खोरे अशांत होते. आतंकवाद्यांनी ड्यूटीवर जाण्यासाठी बसस्टॉपवर उभ्या असलेल्या हवाई दलाच्या सैनिकांवर गोळीबार केला. यात काही सैनिक शहीद झाले. मात्र केशव बालंबाल बचावले. काश्मिरात अशांत परिस्थिती असतानाच दोघा भावांचे लग्न ठरले. दोघांच्याही सुट्या रद्द झाल्या. त्यांच्या अनुपस्थितीतच साखरपुडा उरकला गेला. मे महिन्यात दोघांना सुटी मिळाली आणि लग्न समारंभ पार पडला!

बातम्या आणखी आहेत...