आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवाल:2004 मध्ये वैजापूर विधानसभेला राष्ट्रवादीविरुद्ध कोण बंडखोर होते?

वैजापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर येथील काँग्रेसचे मावळते जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर संतापले. आमच्यात भांडणे लावण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी ठोंबरेंना राष्ट्रवादीत आणले, असा आरोप त्यांनी केला. त्यावर चव्हाण यांनी काहीही प्रत्युत्तर दिले नाही. मात्र, भाऊसाहेब ठोंबरे यांनी चव्हाण यांचा प्रवेशनाट्याशी संबंध नसल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. २००४मध्ये वैजापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध कोण बंडखोर होते, असा सवालही त्यांनी चिकटगावकर यांचे नाव न घेता केला.

ठोंबरे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले, दत्तात्रय त्रिभुवन, विजय पवार चेंडूफळकर, माजी जि. प. सदस्य सूरज पवार यांनी पंकज यांना राष्ट्रवादीत सक्रिय करण्याचा गळ घातली होती. मग आम्ही काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना पूर्वकल्पना देऊन पक्षांतराचा निर्णय घेतला. चिकटगावकरांचा याला विरोध होता. त्यामुळे पंकज आणि त्यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी प्रांताध्यक्ष पाटील यांनी दोघांना एकत्रित बोलवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने प्रवेशाला उशीर लागला.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांना उमेदवारी दिली होती. त्या वेळी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष या नात्याने त्यांच्यासोबत होतो. २००४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मला उमेदवारी मिळाली होती. त्या निवडणुकीत कैलास पाटील यांनी मला साथ दिली. त्या निवडणुकीत कुणी पक्षाविरुद्ध बंडखोरी केली हे सर्वांना माहिती आहे, असेही भाऊसाहेब म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...