आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारी कार्यालयात फक्त महापुरुषांची छायाचित्रे असावीत, देवी-देवतांचे फोटो नसावेत, असा स्पष्ट शासन निर्णय आहे. तरीही विद्यापीठासह उपकेंद्रात सर्रास देवांचे फोटो लावलेत. कुलगुरूंनी शासन निर्णयाची अंंमलबजावणी करावी, अशी मागणी डॉ. शंकर अंभोरे यांनी केली. अधिसभा बैठकीतील प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी हा मुद्दा मांडला आहे.
प्रश्नोत्तराचा तास संपत असताना चार वाजता विद्यापीठ विकास मंचचे सदस्य सभागृहात आले. त्यामुळे त्यांना प्रश्न मांडता आले नाहीत. कौशल्य विकास केंद्रासाठी शासनाने अंबाजोगाई येथे २५ एकर जागा दिली आहे. तेथे केंद्र कधी सुरू करणार, असा प्रश्न डॉ. नरेंद्र काळे यांनी विचारला. त्यासाठी शासनाच्या निधीची आम्ही वाट पाहत असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
डॉ. उमाकांत राठोड यांनी रजेच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केला. संस्थेत मोठ्या रजेसाठी खोटी कारणे आणि वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन रजा घ्यावी लागते. त्यावर मार्च २०१२ मध्ये परिपत्रक काढल्याचे उत्तर कुलसचिवांनी दिले. विद्यापीठाने १५० संशोधन केंद्रे दिली. तेथे सुविधा नाहीत याकडे डॉ. मुंजोबा धोंडगे, हरिदास सोमवंशी यांनी लक्ष वेधले.
विद्यापीठ लवकरच तयार करणार पोर्टल प्रश्नपत्रिका सेट करणे, उत्तरपत्रिका तपासणे, कॉलेज तपासण्यासाठी तज्ज्ञ समितीत काम करणे आदींसह विद्यापीठाच्या विविध कामांत योगदान देण्यासाठी कॉलेजचे प्राध्यापक तयार असतात. पण ठरावीक चेहऱ्यांना संधी दिली जाते.त्यात पारदर्शकतेसाठी विद्यापीठाने पोर्टल तयार करावे. त्यात इच्छुक प्राध्यापक आपली माहिती भरून देईल. विद्यापीठाला वाटले तर त्यांचा विनियोग होईल, असे मत डॉ. विक्रम खिल्लारे यांनी मांडले. त्यावर कुलगुरूंनी होकारार्थी उत्तर देत लवकरच याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.