आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे सवाल:अवघ्या 40 किमीवर धरण असताना आठ दिवसांआड पाणी का येतेॽ; शहरात पाणी संघर्ष यात्रा सुरू, मुख्यमंत्र्यांना पाठवणार 25 हजार पत्रे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“मुख्यमंत्री साहेब... मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण औरंगाबादपासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर आहे. मग शहरातील नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा कसा होतोॽ नळाला पाणी आले की वीज जाते. पाण्यासारखी मूलभूत गोष्टदेखील पूर्ण होऊ शकत नाही. कृपया आपण लक्ष घालावे. आपला औरंगाबादकर.’ असे पत्र पवननगरातील रहिवासी गंगाराम रहाणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. अशी २५ हजार पत्रे लिहून ती मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मनसेने शहरात शनिवारपासून पाणी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. पहिल्या दिवशी पवननगरातील नागरिकांकडून पत्रे लिहून ती पाण्याच्या हंड्यात जमा करण्यात आली. शहराच्या विविध भागांतून २५ हजार नागरिक पत्र लिहिणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. जायकवाडी ते नक्षत्रवाडी ही मुख्य पाइपलाइन गेल्या पंचवीस वर्षांत सत्ताधारी पक्षाला पूर्ण करता आली नाही. आतापर्यंत अनेकदा टेंडर प्रक्रिया झाली. परंतु टक्केवारी, राजकारण अन् या ना त्या कारणाने ही योजना पूर्ण झाली नाही, असा आरोप मनसेकडून करण्यात आला.

या वेळी जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, वैभव मिटकर, बिपिन नाईक, शहराध्यक्ष गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, प्रशांत जोशी, गणेश सोळुंके, राहुल पाटील, मंगेश साळवे, अविनाश पोफळे, रामेश्वर मोरे, अभय देशपांडे, अमित ठाकूर, विकी जाधव, प्रशांत दहिवडकर, संकेत शेटे, रूपेश शिंदे, रीना राठोड, किरण जोगदंड, संदीप आरक, प्रतीक गायकवाड, मनीष जोगदंड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...