आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन रद्द का करू नये? दहा वर्षांपूर्वी पोलिसांना मारहाणीचे प्रकरण

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०११ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात वाहन अाडवे अाणून पाेलिसाला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे तत्कालीन अामदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाची शिक्षा झाली हाेती. पुन्हा असे कृत्य न करण्याच्या अटीवर न्यायालयाने त्या वेळी त्यांना जामीन दिला हाेता. मात्र, जाधव यांच्याकडून पुन्हा गुन्हेगारी कृत्ये घडली आहेत. त्याआधारे त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करणारा अर्ज मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी साेमवारी अाैरंगाबाद खंडपीठात दाखल केला. त्यावर न्या. मंगेश पाटील यांनी जाधव यांना नाेटीस बजावून ‘जामीन रद्द का करण्यात येऊ नये?’ अशी विचारणा केली अाहे. पुढील सुनावणी दाेन आठवड्यांनंतर हाेईल.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ५ जानेवारी २०११ रोजी अाैरंगाबाद दाैऱ्यावर अाले हाेते. त्या वेळी विरेगावचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे खुलताबाद ईदगाह टी पॉइंटजवळ वाहतूक नियमन करत होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा वेरूळ लेणीकडे निघाल्याने पाेलिसांनी टी पॉइंटजवळ इतर वाहने थांबवली हाेती. यादरम्यान तत्कालीन अामदार जाधव फॉर्च्युनर गाडी चालवत तिथे अाले. त्यांच्यासाेबत मनसेचे तेव्हाचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील बनकर व वाहनचालक संतोष जाधव हे गाडीत बसलेले होते.

पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र जाधव यांनी सहायक पोलिस निरीक्षक कोकणे यांच्या अंगावर गाडी घातली. त्या वेळी प्रसंगावधान राखत कोकणे यांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेऊन जीव वाचवला. त्यानंतर जाधव यांनी वेरूळकडे सुसाट कार दामटली. काेकणे व इतर पाेलिसांनी पाठलाग करून वेरूळ लेणीसमोर जाधव यांची गाडी अडवली. तेव्हा जाधव यांनी शिवीगाळ करत कोकणे यांना मारहाण, दोन महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली हाेती. या प्रकरणात शासकीय कामात अडथळा, शासकीय कर्मचाऱ्याला जखमी करणे, विनयभंग करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी देणे अादी गुन्हे जाधव यांच्यावर दाखल झाले हाेते. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी त्यांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली हाेती. तर बनकर व जाधव मात्र निर्दाेष सुटले हाेते.

बातम्या आणखी आहेत...