आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार बोरनारेंचा पोलिसांशी झगडा:माझीच गाडी का अडवता? म्हणत आमदार बोरनारे संतापले

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळ सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांची. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मराठवाडा आढावा बैठकीसाठी तैनात बंदोबस्त. आमदार रमेश बोरनारेंचा चालक विभागीय आयुक्तालयात गाडी नेण्यासाठी अट्टहास करत होता. त्यावरून पोलिसांचा त्यांच्याशी वाद झाला. बाकी आमदारांच्या गाड्या जाऊ दिल्या, माझीच गाडी का अडवता, असा सवाल उपस्थित करत आमदार बोरनारे पोलिसांशी झगडत होते. शेवटी पोलिस आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद मिटला.

वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांची गाडी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रवेश देण्यावरून आमदार आणि पोलीसांचा वाद झाला. सकाळी सव्वाअकरा वाजता ड्रायव्हर आमदारांना घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ आला. कार्यालयाच्या पेट्रोल पंपापासूनच सर्व गाड्या अडवलेल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या आमदारांनी पोलिसांसोबत वाद घालायला सुरुवात केली. दहा मिनिटे हा वाद चालला. अखेरीस पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या हस्तक्षेपाने हा वाद मिटवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...