आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा अधिवेशनात सवाल |:2512 कोटींच्या मदत घोषणेचा उल्लेख पुरवणी यादीत का नाही?

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीने २५१२ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे प्राथमिक पंचनाम्यातून समोर आले. त्यानुसार भरपाई, मदत देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. परंतु, बुधवारी विधिमंडळाच्या सभागृहात २५ हजार कोटींच्या सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये मदतीचा कुठेही उल्लेख का नाही, असा सवाल िवधान परिषदेतील िवरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. असा उल्लेख नसल्याने या सरकारला शेतकऱ्यांना मदत करायचीच नसल्याचे स्पष्ट होते, असा आरोपही त्यांनी केला.

पावसाळी अधिवेशनात गुरुवारी विरोधी पक्षांच्या वतीने नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर दानवे म्हणाले, की जुलै - ऑगस्टमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांतील सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांसह केळी, संत्र्याचे नुकसान झालेे. हजारो ठिबक, तुषार सिंचन संच वाहून गेले आरहेत, असेही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.

बातम्या आणखी आहेत...