आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विचार:जैन समाजाचीच इच्छा नसेल तर सरकार सम्मेद शिखरबाबत आग्रही का?

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सम्मेद शिखर... जैन धर्माचे पवित्र तीर्थस्थळ. झारखंड सरकारने या तीर्थस्थळास पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. नेहमी शांत आणि मौन राहणारा जैन समाज सरकारच्या या निर्णयास विरोध करीत आहे. नाइलाजाने रस्त्यावर उतरला आहे.

एका जैन संतांनी तर त्यासाठी प्राणत्यागही केला. विरोधाचे कारणही स्पष्ट आहे -तीर्थस्थळाच्या शंभर-दोनशे मीटर परिसरातच मांस, मद्यविक्री सुरू होईल. अर्थातच यामुळे तीर्थस्थळाचे पावित्र्य धोक्यात येईल. त्यामुळेच आता प्रश्न असा आहे की, जर तीर्थस्थळावर श्रद्धा असलेल्या लोकांनाच जर याला पर्यटनस्थळ करणे नको असे वाटत असेल तर मग सरकार पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबत आग्रही का आहे ?

वास्तविक, सम्मेद शिखरस्थित असलेला भाग आदिवासीबहुल आहे आणि पर्यटनस्थळ घोषित करण्यामागचा उद्देश राज्य सरकारचा मतपेढीवर डोळा आहे. पर्यटनास प्रोत्साहन असा निर्मळ हेतू सरकारचा असेल तर झारखंडमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यटनास चालना मिळू शकते.

केवळ एक ठिकाण अन् काही तुटपुंज्या मतांसाठी एका शांत समाजाला का डिवचले जात आहे, याचा विचार सरकारने केला पाहिजे. सम्मेद शिखरच्या मुद्द्यावर समाजासोबत विचारमंथन झाले पाहिजे. त्यांच्या भावना समजून घेत झारखंडची जनता आणि जैन समाज दोघांचे हित डोळ्यासमोर ठेवून तातडीने निर्णय झाला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...