आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 90 टक्के शिक्षक गावात रहात नाहीत:खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात, आमदार प्रशांत बंब यांचा आरोप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातले जवळपास 70 टक्के शिक्षक गावात रहात नाहीत. ते खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात, असा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.

बंब यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आरोपांच्या फैरी झाडल्या. विशेषतः शिक्षक मतदार संघ रद्द करा, अशी मागणी त्यांनी नुकतीच केली आहे. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली.

तर त्यांचे पूजन करा

आमदार बंब म्हणाले की, शिक्षक आमदार म्हणतात की, केवळ पाच टक्के शिक्षक अपडाऊन करतात. मात्र, राज्यातील जवळपास 90 टक्के शिक्षक आपल्या मुख्यालयी रहात नाहीत. हे शिक्षक धांदात खोटे बोलतात. चुकीची कागदपत्रे सादर करून घरभाडे घेत आहेत. आता 5 सप्टेंबर रोजी गावात राहणाऱ्या शिक्षकांचे सरपंच आणि शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी घरी जाऊन पूजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही

आमदार बंब म्हणाले की, सरकारने प्रचंड व्यवस्था केली आहे. माझे शिक्षण देखील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. आता पेक्षा तेव्हाच्या शिक्षकांना जास्त कामे होती. संगणकामुळे शिक्षकांची कामे कमी आणि सोपी झाल्याचे आता दिसून येते. पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या जास्त दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना प्रचंड व्यव्यस्था आहे. शिक्षक लोक गुणवत्ता पूर्वक शिक्षण देत नाही, म्हणूनच ते आपल्या मुलांना खासगी शाळेत टाकतात असा आरोप बंब यांनी केला.

राज्य डबघाईला आले

आमदार बंब म्हणाले की, शेतकऱ्यांचा मागे अनेक गणगणी असतात. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही सरकारने घेतली पाहिजे. मोठ्या प्रमाणात शाळा आणि ग्राऊंड तयार केले आहे. शिक्षकांच्या आणि शिक्षकांना सपोर्ट करणाऱ्या लोकांमुळे आपले राज्य डबघाईला आले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

दोन बिले घेतात

आमदार बंब म्हणाले की, आम्ही मुख्यालयी राहतोच असे मत पदवीधर आणि शिक्षक आमदारांचे म्हणणे आहे. शिक्षकांची मुले जर स्वत:च्या शाळेत शिकवली तर प्रगती होईल. ही नोकरी सुखसोयीसाठी नाही, असे सांगताना काही शिक्षक स्वत:चा व्यवसाय करत आहेत. हे त्यांच्याकडून अपेक्षित नाही. मात्र, तरीही त्यांच्याकडून असे प्रकार घडतात पती पत्नी एकत्रिकरणाच्या नावावर सोबत राहतात. मात्र, काही शिक्षक सरकारकडून दोन बिले घेतात असा आरोपही आमदार प्रशांत बंब यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...