आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोजच्या भांडणाला कंटाळून आपण एकाच घरात वेगळे राहू, असा हट्ट धरणाऱ्या पत्नीचा हट्ट न पुरवल्याने पत्नीने पतीच्या पाठीवर बिअरची बाटली मारून जखमी केले. ही घटना १५ डिसेंबर रोजी एन-११, द्वारकानगर, हडको येथे घडली.
प्रणव प्रभाकर कुलकर्णी (३०, रा. सी-५,२/५, हडको) असे पतीचे नाव आहे. पत्नीने मला जखमी केले असून आईलाही शिवीगाळ केली, अशी तक्रार प्रणवने सिडको ठाण्यात दिली. त्यावरून प्रणवच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक ए. बी. खलसे तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.