आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा:पत्नीच्या प्रियकराच्या धमक्या, पतीची गळफासाने आत्महत्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सहा वर्षांपासून पत्नीचा प्रियकर देत असलेल्या धमक्यांना घाबरून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ डिसेंबरला सकाळी उघडकीस आली.आकाश सोळुंके (२६, रा. सिडको परिसर) याचे जळगाव जिल्ह्यातील एका तरुणीशी लग्न झाले होते. काही दिवसांतच तिचे अर्जुन रावसाहेब भिसे (३४, रा. गल्ली क्र. २, नारेगाव) याच्याशी प्रेमसंबंध जुळले. त्याची माहिती आकाशला मिळताच त्याने पत्नीला खडसावले. त्यानंतर भिसेने पत्नीला पुन्हा धमकावायचे नाही, असा वारंवार दम आकाशला भरला. आकाशने पत्नीला माहेरी पाठवून दिले. पत्नीला माहेरून घेऊन ये, अशी धमकी भिसे आकाशला देत होता.

आकाशने १७ डिसेंबरला जेवण केले आणि ‘वडिलांना चांगले सांभाळ’ असे लहान भावाला सांगून तो झोपण्यास गेला. १८ डिसेंबरला सकाळी भाऊ त्याला उठवण्यास गेला असता आकाशने गळफास घेतल्याचे त्याला दिसले. आकाशचे वडील रामभाऊ सोळुंके (८०) यांच्या तक्रारीवरून अर्जुन भिसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...