आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवर्षी आयोजन:वन्यजीव सप्ताहानिमित्त छायाचित्र प्रदर्शन ; 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान फोटो पाठवण्याचे आवाहन

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमी (ईआरएफईए) संस्थेमार्फत वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने ऑक्टोबर महिन्यात वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. १ ते ४ ऑक्टोबर या काळात हे प्रदर्शन हेाणार असून सर्व वयोगटातील छायाचित्रकारांना यात सहभागी होता येईल. प्रदर्शनात उत्कृष्ट छायाचित्र पाठवावित, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

निसर्गप्रेमी छायाचित्रकार या प्रदर्शनात वन्यजीव आणि मोबाइलमध्ये काढलेले वन्यजीव निगडीत सूक्ष्म प्रकारातील छायाचित्र अशा २ गटांत छायाचित्र पाठवता येतील. उत्कृष्ट छायाचित्रांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देता येतील. सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रदर्शनातील निवडक छायाचित्रे संस्थेमार्फत दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या पक्षी महोत्सवात व इतरत्र प्रदर्शित केली जाणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी आणि छायाचित्रकार सतीश जोशी यांनी सांगितले. प्रदर्शनात सहभाग नोंदविण्यासाठी आणि त्यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी इच्छुकांनी संस्थेचे कार्यालय १२०, शास्त्रीनगर, हेडगेवार हॉस्पिटलच्या मागे, गारखेडा रोड येथे अथवा संयोजक कुणाल विभांडिक ७२७६८९५९१९ व श्रवण परळीकर ७३८७१९०३१७ यांना संपर्क करावा.

बातम्या आणखी आहेत...