आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा केंद्रावरील गोंधळ:औरंगाबादच्या परीक्षा केंद्रावरील गोंधळ प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार - कुलगुरू प्रमोद येवले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय होवून परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकाराची गंभीर दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील घेतली. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या परीक्षा नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ही बाब गंभीर असून, या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला असून, दोन दिवसात सविस्तर अहवाल ही पाठविण्यात येणार असल्याचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले. तसेच त्या सविस्तर अहवालासाठी एक समिती गठीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठांतर्गत होणाऱ्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि लसीकरणामुळे यंदा परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी सांगितले होते. विद्यार्थ्यांचा लिखानाचा सराव कमी झाल्याची बाब लक्षात घेवून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १ जून पासून परीक्षा होणार असले वेळापत्रक जाहिर करत विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अधिकचे प्रतीतास पंधरा मिनिट वेळही वाढवून दिला.

मात्र गुरुवारी झालेल्या पेपरमध्ये शहरातील विजेंद्र काबरा महाविद्यालय, शेंद्रा येथील महाविद्यालय या केंद्रांवर मर्यादेपेक्षा अधिकचे विद्यार्थी देण्यात आले. शिवाय हॉलतिकीटही परीक्षेच्या काही तास अधिपर्यंत उपलब्ध न झाल्याने तोंडी आसनक्रमांक सांगण्यात आला. या सर्व प्रकारात विजेंद्र काबरा महाविद्यालय केंद्रावर चक्क दाटीवाटीने एका बाकावर तीन विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. सर्व गोंधळ उडाल्याने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉॅ. गणेश मंझा यांनी देखील केंद्रावर भेट दिली तर असलेल्या स्कॉडने देखील विद्यार्थी गैरसोय झाल्याचा अहवाल दिला. प्राथमिक अहवालातही क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आणि सुविधांचा, समन्वयाचा अभाव असे अहवालात नमूद केले आहे. आता

शिक्षण मंञी सामंत यांनी कुलगुरुंना या प्रकारासंबंधी तात्काळ अहवाल मागितला असून जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या पार्श्वभूमीर कुलगुरूंनी कडक भूमिका घेत दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले . तसेच, प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे सुपुर्द केला असून सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे, परीक्षा केंद्रावर बैठक क्षमतेपेक्षा अधिकची संख्या देणाऱ्यांचा शोध घेणार आहे. या गंभीर प्रकारात नेमकी चूक कुणाची आहे, याची तपासणी करण्यात येणार असून यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कुलगुरुंनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...