आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरेल, जेलमध्ये जाईल, पण स्वाभिमान सोडणार नाही:सासरे अन् केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना जावई हर्षवर्धन जाधवांचा इशारा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मरेल, जेलमध्ये जाईल, पण स्वाभिमान सोडणार नाही, असा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना दिला आहे. जाधव यांचा तसा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्याची जोरदार चर्चा सुरूय.

मरणं पसंद करेल!

हर्षवर्धन जाधवांनी व्हिडिओत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, रावसाहेब दानवेंनी अब्रू नूकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. यावर कोर्टात काय होईल ते होईल, पण आपल्याला वाटत असेल की, हर्षवर्धन जाधव चुकेल आणि आपल्या पायाशी लोटांगण घेईल असे काहीही नाही. तसे होणारही नाही. मी मरणे पसंद करेल, पण झुकणार नाही. आम्ही झुकणाऱ्यांपैकी नाही. आपण मंत्री आहात. मोठे आहात, तरीही स्वाभिमानाचा झेंडा आम्ही सोडणार नाही. आम्ही लखोजी जाधवांचे वंशज आहोत, असेही त्यांनी ठणकावले.

जाधव आणि दानवे वाद

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला. गेल्या काही काळापासून हर्षवर्धन व त्यांची पत्नी या वेगवेगळे राहतात. यापूर्वीही हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मात्र, अजूनही रावसाहेब दानवे यांनी जाधव यांच्या कुठल्याही आरोपाला समोर येऊन उत्तर दिलेले नाही. आता हर्षवर्धन जाधव यांनी पुढे येत रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याचे सांगितले आहे.

नातवाच्या नावे प्रॉपर्टी करायला विरोध

आपला मुलगा आदित्य यांच्या नावावर आपली मालमत्ता व्हावी, याचे काम हर्षवर्धन जाधव यांनी सुरू केले आहे. मात्र, त्यालाही रावसाहेब दानवे यांनी विरोध केला आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले असून, सत्र न्यायालय व जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या बाजूने निकाल दिल्याचे हर्षवर्धन जाधव सांगतात. आदित्य सध्या सध्या अठरा वर्षांचा आहे. येणाऱ्या काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...