आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी साई पालखीला सुरुवात:दरदिवशी 35 किमी चालणार ; कैलासनगरातून 150 भाविकांनी घेतला उपक्रमात सहभाग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैलासनगर भागातील नागरिकांनी ३ डिसेंबर रोजी कैलासनगर ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले. यात दीडशेहून अधिक भाविक तीन दिवस पायी चालणार आहेत. दत्तजयंतीनिमित्त पालखी सोहळा, शाल अर्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी कैलासनगर येथे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले होते. या वेळी संस्थापक अध्यक्ष राजू वाडेकर, गणेश सिरसाठ, आकाश थोरात, देवदत्त दांडगे, गणेश भोयणे, प्रभाकर गायकवाड, किशोर शेरे, अजय खांडेकर, प्रभुदादा गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रत्येक दिवशी ३५ किलोमीटर भाविक चालणार आहेत. यासाठी आयोजकांकडून पाण्याच्या बॉटल्स, जेवणाची व औषधाची सुविधा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात ५० महिलांचा सहभाग आहे. या वेळी खाेकडपुरा रस्त्यावर भाविकासांठी नाष्ट्याची सुविधा करण्यात आली होती. रस्त्यावर रांगोळीसुद्धा रेखाटण्यात आली होती. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेत तिसगाव टेकडी, वसुसायगाव, वैजापूर चौफुली बेळगाव, दशरतवाडी या ठिकाणी मुक्काम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...