आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:जी-20 च्या पाहुण्यांना खड्डे दाखवणार का ? फुले टाकून काँग्रेसचे आंदोलन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये फुले टाकून काँग्रेसने गांधीगिरी आंदोलन केले. जी-२० च्या पाहुण्यांना हे खड्डे दाखवणार का, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. हजारो नागरिक दररोज प्रवास करीत असलेल्या रस्त्यांकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत हा रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत मनासमोर येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी दिला आहे.

अर्बन मेडिकलसमोरून टीव्ही सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तीच अवस्था रायगडनगरमधून जातानाही झाली आहे. या दोन्ही रस्त्यांवरून टीव्ही सेंटरकडे जाण्यासाठीचा रस्ता असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा खड्ड्यांमुळे अपघात होतात. या रस्त्याबाबत गेल्या वर्षभरापासून तक्रारी केल्यानंतरही खड्डे बुजवले जात नसल्यामुळे नागरिकांना कंबरदुखी, मानदुखीसारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिव्य मराठीने आयोजित केलेल्या नगरसेवकांच्या अभिरूप महासभेतही भाजप नगरसेवक नितीन चित्ते यांनीही मनपा आयुक्तांसमोर हे दोन्ही रस्ते करण्याची मागणी केली होती. या वेळी माजी नगरसेवक मोहसीन अहमद, डॉ. पवन डोंगरे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...