आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक:आपचे सीएम दावेदार गढवींचा गड बनेल की नाही ? ; जातीय समीकरण विस्कळीत

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

द्वारका जिल्ह्यात दाेन मतदारसंघ आहेत. द्वारका व जाम खंबालिया. आप पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार इशुदान गढवी या मतदारसंघातून उभे आहेत. खरे तर गढवी यांना प्रचारासाठी अवधी केवळ १५ दिवसांचा आहे. एवढे असूनही येथील ग्रामीण भागात त्यांचा डंका एेकायला मिळत आहे. टीव्ही पत्रकारितेच्या काळात गढवी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फाेडण्याचे काम केले आहे. त्यातच त्यांचा ‘महामंथन’ हा कृषीवर आधारित कार्यक्रम चांगलाच गाजला हाेता. म्हणूनच त्यांचा चेहरा अपरिचित नाही. काही निश्चित सांगता येत नसले तरी ते निवडणूक लढतीत हे स्पष्ट आहे.

जिल्ह्यात एकूण तीन लाख मतदार आहेत. शहरांतर्गत प्रत्येकी ३० हजार मतदार अशी क्षेत्रीय विभागणी आहे. खंबालिया, भानवड आणि सुलाया. उर्वरित मतदार ग्रामीण भागात आहेत. काँग्रेसचे विक्रम भाई माडम हे विद्यमान आमदार आहेत. ग्रामीण भागांतील त्यांची निष्क्रियता जगजाहीर आहे. ते जामनगरमध्ये वास्तव्याला आहेत. पाच वर्षांत त्यांनी खंबालियात संपर्क कार्यालयदेखील सुरू केले नाही, असे लाेक सांगतात. समाजाच्या दृष्टीने ५५ हजार अहिर मतदार आहेत. त्यांची विभागणी काँग्रेस व भाजपमध्ये हाेईल. कारण दाेन्ही उमेदवार विक्रमभाई माडम व मुडभाई वेरा हे दाेघेही अहिर समाजाचे आहेत. मतांची विभागणी काँग्रेस व आपमध्येही हाेऊ शकते. सतवारा समुदायाचे मतदार ४० हजार आहेत. ते भाजपवर नाराज आहेत. कारण पक्षाने त्यांच्या समुदायाला तिकीट दिले नाही.

ही मते काही प्रमाणात गढवींना मिळू शकतात. क्षत्रिय ३० हजारांवर आहेत. त्यांचा काैल काेणाला मिळेल हे सांगता येत नाही. एकगठ्ठा तर नाहीच. लाेहाना व गढवी प्रत्येकी १६ हजार आहेत. त्यातही गढवींचे एकगठ्ठा आपला मिळतील. त्यांचा मतदानाचा टक्काही जास्त राहील. ब्राह्मण १७ हजार आहेत. पटेल सहा हजार. या मतांचीही विभागणी हाेईल. रबारी, भरवाड मते आपला मिळू शकतात. कारण प्रत्येक घरातील महिलेला महिना एक हजार रुपये, तरुणांना बेराेजगारी भत्ता, ३०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ ही आश्वासने जनतेला भुरळ घालू शकतात.दातराणाहून भातेलला जाताना गढवींशी चर्चा झाली. पत्रकार या नात्याने सांगा - गुजरातमध्ये आपचे सरकार स्थापन हाेईल? त्याचे थेट उत्तर देणे त्यांनी टाळले.

ते म्हणाले, राज्यभरात भाजप-आप यांच्यात टक्कर आहे. मग काँग्रेसचे जातीय गणित काेठे जाईल? त्यावर पक्षाचे काेणते जातीय गणित असते? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. परंतु नंतर ते म्हणाले, उमेदवाराच्या जातीची मतेच काँग्रेसला मिळतील, इतर नाही. मात्र त्यांच्या ४०-५० जागा निश्चित आहेत? त्यावर गढवी म्हणाले, तुम्ही २०१७ च्या काँग्रेसबद्दल बाेलत आहात. २०२१ मध्ये काँग्रेस संपली आहे. आप पक्षाचा प्रभाव असलेल्या सुरतचा उल्लेख झाला तेव्हा या ठिकाणी आम्हाला ८ जागा मिळतील. लाेक तेथे अतिरिक्त चार जागांबद्दल बाेलू लागले आहेत. त्यावर कमाल ८ जागा नक्की आहेत, असे त्यांनी सांगितले. एकूणच आपच्या आश्वासनांना काैल मिळाल्यास राज्यातील गणिते फिसकटतील. काही असाे, गुजरातमध्ये माेफत गाेष्टींची चांगलीच हवा दिसते.

बातम्या आणखी आहेत...