आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागरूकता:मृत्युपत्र कायदा आणि आपण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृत्युपत्र कसे असावे? मृत्युपत्राचे तीन भाग असतात...

पहिला भाग { मृत्युपत्र करणाऱ्याचे नाव, कुटुंबातील सर्व सदस्यांची संपूर्ण माहिती आणि मृत्युपत्र करणाऱ्याकडे असणाऱ्या मालमत्तेचा संपूर्ण तपशील नमूद असणे गरजेचे आहे. { मृत्युपत्र करणाऱ्याला आपली मालमत्ता अधिकृतपणे ज्या व्यक्तीच्या नावावर करायची आहे त्या व्यक्तीचा तपशीलदेखील नमूद असावा. { उत्तराधिकारी व्यक्तीचे मृत्युपत्रकर्त्याशी असलेले नाते, एकमेकांना ओळखण्याचा कालावधी आणि ज्याच्या नावे संपत्ती करायची आहे त्याची कारणे देखील नमूद करणे आवश्यक असते. { समजा एखाद्याला स्वत:च्या संपत्तीच्या वाटणीत एखाद्या विशिष्ट व्यक्तीला सहभागी करायचे नसल्यास अशा व्यक्तीला संपत्तीत हिस्सा न देण्यामागची कारणे आणि इतर माहितीदेखील मृत्युपत्रात असावी.

दुसरा भाग : मृत्युपत्र करणाऱ्याने नमूद केले पाहिजे की त्याने ते पूर्णपणे वाचले आहे. त्यानंतर मृत्युपत्र करणाऱ्याने आणि साक्षीदाराने वकिलासमोर सही करणे अनिवार्य असते.

तिसरा भाग : मृत्युपत्रात साक्षीदारांची नावे आणि संपूर्ण तपशील समाविष्ट असावा. साक्षीदाराची विश्वासार्हता : मृत्युपत्र करताना कोणालाही साक्षीदार बनवता येते. भारतीय कायद्यानुसार, साक्षीदाराचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे आणि तो मानसिकदृष्ट्याही सुदृढ असणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती किती विश्वासार्ह आहे, याची निवड मृत्युपत्रकर्त्यावर अवलंबून असते.

ते कुठे ठेवावे? : मृत्युपत्र केल्यानंतर ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे. मृत्युपत्र करणारा ते स्वतःकडे ठेवू शकतो, ज्या साक्षीदारासमोर ते केले आहे किंवा ज्यांच्यावर त्याचा विश्वास आहे, अशा कोणत्याही व्यक्तीजवळ ते ठेवता येते. मृत्युपत्र वाचनात वकिलाची भूमिका : सह-भागीदारांसमोर मृत्युपत्राचे वाचन केले जाते तेव्हा वकिलाची विशेष काही भूमिका नसते. वकिलाने मृत्युपत्र वाचून दाखवावे असेही नाही. परंतु, कोणत्याही कायदेशीर बाजूसाठी किंवा कोणत्याही स्पष्टीकरणासाठी वकिलाशी संपर्क साधला जाऊ शकतो.

इच्छेनुसार नामनिर्देशन आणि त्याचा पुरावा : बरेचदा असे दिसते की, मृत्युपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर, नामांकित सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणीतरी मालमत्तेवर दावा करतो. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युपत्र करते तेव्हा त्याला स्वत:च्या मालमत्तेमधला किती भाग कोणाला द्यायचा आहे, संपत्तीची वाटणी कशी आणि किती प्रमाणात करायची आहे, हे सर्व तपशील मृत्युपत्रात स्पष्टपणे असले पाहिजेत. मृत्युपत्रात मृत्युपत्रकर्त्याने दिलेली माहिती कायद्याच्या दृष्टीने वैध मानली जाते. यानंतर, कोणीही त्यावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही. कोणीही त्याला कायदेशीर आव्हान देऊ शकत नाही. मृत्युपत्र तयार करण्याची प्रक्रिया : मृत्युपत्राची नोंदणी करणे बंधनकारक नसले तरी ती अवश्य करावी. मृत्युपत्र तयार करण्यासाठी मुद्रांक शुल्काची, कोणत्याही प्रकारच्या सरकारी शुल्काची गरज नसते. एखाद्या व्यक्तीला अधिकृतपणे मृत्युपत्र बनवायचे असेल, तर ते १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनवता येते. मृत्युपत्रात सर्व माहिती समाविष्ट केल्यानंतर, मृत्युपत्र करणाऱ्याला साक्षीदारांसह उपनिबंधक कार्यालयात जावे लागते. मृत्युपत्राची नोंदणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये निबंधकाची नियुक्ती केलेली असते. कागदपत्रे म्हणून मृत्युपत्र करणारा आणि साक्षीदार यांची छायाचित्रे तसेच ओळखपत्रे आवश्यक आहेत. नोंदणीनंतर हे मृत्युपत्र कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.

बातम्या आणखी आहेत...