आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा विश्वातील अविस्मरणीय किस्से:विल्सन हाेते भारताचे पहिले वर्ल्ड चॅम्पियन; चाैथ्या सत्रामध्ये यशस्वी

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघ ऑलिम्पिकमध्ये सातत्याने साेनेरी यशाचा पल्ला गाठता हाेता. मात्र, भारताच्या नावे जागतिक दर्जाचे जेतेपद नव्हते. हीच उणीव विल्सन जाेन्स यांनी दूर केली. पुण्यात जन्मलेल्या या विल्सनने बिलियर्ड््स खेळात दाेन वेळा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. यासह त्यांनी भारताचा शिरपेचामध्ये जागतिक स्तरावरील मानाचा तुरा राेवला. त्यांनी स्नूकर खेळण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी अल्पावधीत आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावला. मात्र, त्यानंतर ते वयाच्या १८ व्या वर्षी बिलियर्ड््सकडे वळले. आपल्या कामातून मिळालेल्या वेळेत ते सातत्याचे याचाच कसून सराव करत हाेते. त्यामुळे त्यांना या नित्याच्या सरावातून आपल्या नावे ११ वेस्टर्न इंडिया आणि १२ वेळा राष्ट्रीय किताबाची नाेंद करता आली. याच दर्जेदार कामगिरीतून त्यांनी दाेन वेळा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचाही पराक्रम गाजवला. त्यांनी दुसऱ्या युद्धाच्या वेळी दारूगाेळ्याच्या कारखान्यात काम करतानाही आपला बिलियर्ड््सचा छंद अवितरपणे जपला. त्यांनी १९५८ मध्ये पहिल्यांदा बिलियर्ड््स वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर दुसऱ्यांदा याच किताबासाठी त्यांनी १९६४ पर्यंत मेहनत करावी लागली. त्यांनी कामगिरीत सातत्य ठेवत सहा वर्षांत पुन्हा हाच किताब जिंकला.

अविस्मरणीय : स्वातंत्र्यानंतर फुटबाॅलची किक

७५ वर्षांतील यशस्वी माेहिमा (१९५६ ते ६० ) - फाळणीनंतर १९५६ मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारत-पाक संघांत हाॅकी सामना झाला. भारताने १-० ने विजय संपादन करत सुवर्ण जिंकले. भारताचे स्पर्धेत ३८ गाेल हाेते.

-मिल्खा सिंग (१९५८ कॉमनवेल्थ) स्पर्धेत सुवर्णपदक विजेते पहिले भारतीय खेळाडू हाेते. -भारतीय फुटबॉल संघाने १९५६ ऑलिम्पिक स्पर्धेत चाैथे स्थान गाठले हाेते. यात भारताची कामगिरी सरस ठरली. टीमने ऑस्ट्रेलियावर ४-० ने मात केली हाेती. -भारताचा जलतरणपटू मिहिर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई स्वीमर ठरला हाेता. -रामनाथन कृष्णन हे विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठणारे भारताचे पहिले टेनिसपटू ठरले हाेते. त्यांनी १९६० मध्ये चिलीच्या लुईसचा पराभव केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...