आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्टअप:‘जितो कनेक्ट’ लाभदायी; स्टार्टअपसाठी 38 कोटी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्वेलरी, फॅशन, स्टार्टअप्स, शिक्षण व विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिकसह इतर अनेक क्षेत्रातील उत्पादन व सेवांचा भव्य ट्रेड फेअर ही पुण्यात झालेल्या जीतो कनेक्ट या आंतरराष्ट्रीय परिषदेची वैशिष्ट्ये ठरली. तीन दिवसांच्या या परिषदेला साडेचार लाखांहून अधिक उद्योजक, व्यापारी व इतर क्षेत्रातील

लोकांनी हजेरी लावली.
यानिमित्ताने १८८ फ्रँचायझींचे वाटप झाले तसेच स्टार्टअपमध्ये ३८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली, अशी माहिती जितो अपेक्सचे व्हाइस चेअरमन विजय भंडारी यांनी दिली.

भंडारी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने ‘जितो पुणे चॅप्टर’च्या वतीने गंगाधाम ते कात्रज-कोंढवा रस्त्यावर ‘जितो कनेक्ट २०२२’ तीनदिवसीय परिषद घेण्यात आली. कोरोनानंतर उद्योग-व्यवसायाला चेतना व ऊर्जा देण्यासाठी या उपक्रमाची आवश्यकता होती. तीन दिवसांच्या या परिषदेत उद्योग व व्यापार क्षेत्रातील आव्हाने, संधी आणि आजारी उद्योगावरील उपाय यासंबंधी विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. याबरोबरच स्थानिकसह देश व विदेशातील व्यापार-उद्योगांच्या संधीबद्दल या ठिकाणी झालेली चर्चासत्रे व परिसंवादातून माहिती मिळाली.

डिजिटल तंत्रज्ञान, फिल्म, शेअर मार्केट, सोशल मीडिया, स्टार्टअप्ससह अनेक नव्याने विस्तारत असलेल्या उद्योगात गुंतवणूक व व्यवसायाच्या संधीबद्दल मार्गदर्शन झाले. जैन पॅव्हेलियनच्या माध्यमातून जैन धर्माविषयी माहिती देण्यात आली.

चाेरट्यांचेही ‘उद्योग’; पाच लाखांचा एेवज लंपास
या प्रदर्शनात लागलेल्या चार स्टॉलमधून पाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवल्याचे उघडकीस आले. नीलेश पारख यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्केट यार्ड-कोंढवा रस्त्यावर झालेल्या या परिषदेत पारख, प्रशांत लुणावत, प्रतीक रांका, योगेश चुत्तर यांच्या स्टॉलमधील रक्कम चोरट्यांनी चोरली. एकूण ४ लाख ५५ हजारांची रोकड, हिरेजडित ब्रेसलेट, दोन मोबाइल संच असा ऐवज चाेरट्यांनी लांबवला.

बातम्या आणखी आहेत...