आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात अवकाळी दाणादाण:मेघ गर्जनेसह 36.3 मिमी पावसाची नोंद; रब्बीतील पिके, भाजीपाला, फळबागांना मोठा फटका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शहर परिसरात मेघ गर्जनेसह धो धो अवकाळी पाऊस पडला. हवामान बदलामुळे ऋतू चक्रच बदलले आहे. परिणामी हिवाळ्यात 36.3 मिमी पर्जन्यमान झाल्याची नोंद चिकलठाणा वेध शाळेने घेतली आहे. टपोऱ्या थंबांच्या पावसाने वाहन चालकांची त्रेधा उडाली. तर ग्रामीण भागात रब्बीतील पिके, भाजीपाला, फळबागा, विशेषत: आंबे मोहरावर विपरित परिणाम झाला आहे.

बंगालच्या उपसागरावर कमी हवेच्या दाबाचा पट्ट निर्माण झाला होता. चक्री वादळाने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे हवामानात वेगाने बदल झाले. उत्तरेतील अतिशीत वाऱ्यांबरोबरच बाष्पयुक्त वारे वाहिले. सापेक्ष आर्द्रतेत 65 ते 100 टक्क्यापर्यंत वाढ झाली. 7.5 अंशांवर निचांकी पातळीवर घसरलेले तापमान आता 18 अंशांवर जावून पोहोचले आहे. एकुण थंडीच्या ऋतूत अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होऊन सोमवारी शहर परिसरात हलका पाऊस पडला होता. मंगळवारी व बुधवारी ढग घोंगावले. मात्र, जेथे पोषक वातावरण तेथे पाऊस पडला. यातून शहराला दिलासा मिळाला होता.

मात्र, बुधवारी दिवसभर पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले व गुरुवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह टपोऱ्या थेंबांच्या पावसाला सुरुवात झाली. तासभरात धुवाधार पाऊस पडला. इमारतीचे पाणी गल्लीबोळाने ओसांडून वाहिले. सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. यातून वाहन चालवताना चालकांची त्रेधा उडाली. सकाळी मुलांना शाळेत जाताना चिखलमय रस्त्यांचा त्रास झाला. गुरुवारी सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. आर्द्रतेमुळे घरात उकाडा तर पावसाच्या सरींने बाहेर गारवा जाणवत होता. पुढील दोन दिवस ढगाचे आच्छादन जेथे पोषक वातावरण तेथेच पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...