आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड:दिवसाला 350 रुपये कमावून देणारी शहाणी गाढवं, 20 वर्षांपासून 'धर्मा' संस्थेतर्फे संवर्धन

नांदेड4 महिन्यांपूर्वीलेखक: शरद काटकर
  • कॉपी लिंक

'गदर्भ' अर्थात गाढव हा प्राणी समाजात कायम हेटाळणीचाच विषय राहिला आहे. एक प्रकारची शिवी म्हणून ही या प्राण्याचे नाव घेतले जाते. खरंतर गाढव हा प्राणी आज्ञाधारक असून कष्टाच्या कामात तो मोठा आधार देतो. नांदेड जिल्ह्यातील काही गावांसाठी गाढव उपजीविकेचे साधन झाले आहे. आजही या गावांमध्ये बांधकामाचे साहित्य आणण्यापासून ते बियाणे, खतं औंषधी शेतामध्ये नेण्याचं काम गाढवाच्याच सहाय्याने करण्यात येते. दिवसाला एक गाढव ३५० रुपये कमाई करून देते. म्हणूनच ही शहाणी गाढवं ठरली आहेत.

नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील आरळी, कोल्हेबोरगाव, बेळकोनी, सगरोळी, हिंगणी, नायगावमध्ये सुजलेगाव, कोकलेगाव, सालेगाव, कुंटुर, बरबडा, नावंदी, मुखेडमध्ये मुगांव, चिटमोगरा, बेटमोगरा, सलगरा, एकलारा तर देगलूर तालुक्यात तमलूर, नरंगल, खानापूर, सुगाव, देगलूर, धनेगाव या गावांमध्ये उपजिकेच्या व्यवसायासाठी गाढवांचा मोठ्याप्रमाणात वापर होतो. या गावांमध्ये गोदावरी, मांजरा नदी पात्रातून वाळू, तलावातून गाळ नेण्यासाठी या गाढवांचा वापर करतात. शेतामध्ये जाण्यासाठी फारसे रस्ते नाहीत. किती तरी किलोमीटर शेती पसरली आहे. रस्ते नसल्याने वाहने जात नाहीत. पिक खराब होईल म्हणून शेतातून वाहने नेण्यास शेतकरी परवानगी देत नाहीत. पावसाळ्यात पांदन रस्त्यावरून चालनेही कठीण जाते. अशा वेळी पेरणीच्या काळात बियाणे, खत औंषधी नेण्यासाठी गाढवांचाच वापर होतो. मुग, उडीद, सोयाबीनची खळे शेतात होतात. गाढवं शेतात जातात, त्यांच्या पाठीवर गोण्या देऊन ते रस्त्यापर्यंत आणतात. एक किलोमीटरपर्यंत एक गोणी नेण्यासाठी ३० ते ४० रुपये दिले जातात. नियोजन केल्यास दिवसभरात ९ ते १० चकरा सहज होतात. एक जण ३०० ते ३५० रुपये कमाई करून देते.

या चार तालुक्यांत जवळपास सहा हजारावर गाढवांची संख्या आहे. शेतकऱ्यांमधून त्यांची विशेष काळजी घेतली जाते. इतर पशू प्रमाणेच त्यांच्यासाठी शेतात हिरवा चारा लावला जातो. याठिकाणी बाळसेदार गाढवं पाहयला मिळतात. त्यामुळेच पंधरा वर्षात गाढवाला दोन हजारावरून पंचवीस हजार रुपये इतकी किंमत आली आहे.

२० वर्षांपासून 'धर्मा' संस्थेतर्फे संवर्धन

परिसरातील गाढवांच्या आरोग्याची काळजी गत २० वर्षांपासून धर्मा डॉंकी सँक्चुअरी संस्थेतर्फे घेतली जाते. रतिलाल शहा, बोनी शहा यांच्या प्रेरणेतून काम सुरू आहे. २००० मध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले. दरम्यान, केवळ गाढवांसाठी पूर्णवेळ दवाखाना असावा, अशी मागणी या गावातील पशुपालकांची होती. त्यामुळे सगरोळी (ता.बिलोली) येथे धर्मा डॉंकी सँक्चुअरी या संस्थेच्या 'गदर्भ चिकीत्सालय' सुरू केले आहे, संस्थेचे विश्वस्त अभिजीत महाजन यांनी 'दिव्य मराठी' बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...