आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझर्व्ह बँकेचा अहवाल:देशाचे 50 टक्के देणे मप्र-राजस्थानसह 10 राज्यांवर, करवसुलीत महाराष्ट्र आघाडीवर

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सुमारे ६४% लोकसंख्येची १० राज्ये देणेदारीत सर्वात पुढे आहेत. देशाच्या एकूण ७० लाख कोटी रुपयांच्या देणेदारीत या राज्यांची सुमारे निम्मी म्हणजे ३५ लाख कोटी रुपयांची हिस्सेदारी आहे. यामध्ये यूपी, बिहार, पंजाब, मप्र, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश आहे. या बाबतीत उत्तर प्रदेश ६.५३ लाख कोटी रुपयांसह देशात सर्वात पुढे आहे. रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जारी केलेल्या वार्षिक हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्समध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, देशात महाराष्ट्र राज्यपातळीवर सर्वाधिक कर महसूल वसूल करते. महाराष्ट्राच्या तुलनेत मध्य प्रदेशची कर महसूल वसुली एक चतुर्थांश आहे. अहवालानुसार, आर्थिक क्षेत्रात बांधकाम उपक्रम सर्वात जास्त तामिळनाडूत होत आहेत. त्याचा अंदाज यातून येतो की, मप्र (०.६४ लाख कोटी रु.) व राजस्थानमध्ये(०.९६ लाख कोटी रु.) मिळून जेवढे बांधकामाशी संबंधित कामे होत आहेत, त्यापेक्षा जास्त एकट्या तामिळनाडूत (१.९४ लाख कोटी रु.) सुरू आहेत.

उद्योग-व्यवसाय सुलभतेत आंध्र अव्वल, चंदीगड सर्वात मागे राज्य क्रमांक आंध्र प्रदेश 1 उत्तर प्रदेश 2 तेलंगण 3 मध्य प्रदेश 4 झारखंड 5 छत्तीसगड 6 हिमाचल 7 राजस्थान 8 प. बंगाल 9 दिल्ली 12 चंडीगड 29

{नवा व्यवसाय स्थापन करण्यात आंध्र प्रदेश देशात सर्वात सोयीस्कर. चंदीगडमध्ये सर्वाधिक अडचणी. {अरुणाचल, नागालँड व ओडिशाही चंदीगडसोबत २९ व्या क्रमांकावर. {८ राज्यांनी एकूण १०० मध्ये ९५ पेक्षा जास्त स्कोर केला. यात आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व तेलंगण आहेत. {टॉप-१० मध्ये आंध्र, तेलंगणशिवाय सर्व राज्ये उत्तर भारतातील आहेत.

{देशात सर्वात जास्त देणे यूपीनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. {झारखंड व छत्तीसगडवर कमी देणे. {१०,८५३ लाख कोटी रु.सह पुद्दुचेरीवर कमी देणे. उर्वरित ११ हजार कोटी रु.च्या वर आहेत. {राजधानी दिल्लीही २०,८८६ कोटी रु.च्या देणेदारीत दबली आहे.

{गावांत बांधकामाच्या कामात गुंतलेल्या लोकांच्या रोजगारात केरळ अव्वल आहे. {ईशान्य राज्ये वगळता सर्वात कमी (~२६७) सरासरी दैनिक रोजगार मध्य प्रदेशात आहे. {केरळच्या तुलनेत हरियाणात बांधकाम कर्मचाऱ्यांना रोजची मजुरी निम्मी आहे.

धान्य उत्पादनात यूपी पुढे, मप्र दुसऱ्या क्रमांकावर {धान्य उत्पादनात यूपी ५.८ कोटी टनासह टॉपवर. मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर. {पंजाब या यादीत तिसरे(3.04 कोटी टन), राजस्थान (2.42 कोटी टन) चौथे आणि हरियाणा (1.83 कोटी टन) 5वा. {2020-21 दरम्यान 31 कोटी टनांपर्यंत पोहोचले.2019-20 मध्ये 29.97 कोटी टन होते. {डाळींच्या उत्पादनात मप्र पहिले. येथे कडधान्यांचे उत्पादन ५३ लाख टनांवर गेले.

बातम्या आणखी आहेत...