आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेच्या पलीकडे:आयपीएलच्या टीव्ही प्रेक्षकांपैकी ४३% महिला, क्रिकेट लीगने आत्मविश्वास दिला की भारत जागतिक वर्चस्वाचे ब्रँड तयार करू शकतो

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्टमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन नवीन इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझींसाठी सीलबंद ऑफर मागवल्या होत्या. दोन महिन्यांनी हे लिफाफे दुबईत उघडण्यात आले. बीसीसीआयने प्रत्येक संघासाठी किमान २०५७ कोटी रुपये किंमत निश्चित केली होती. सर्वात मोठी धक्कादायक ऑफर ७१६२ कोटी रुपयांची होती. पुढील ऑफर ५७०० कोटी रुपयांची होती. २००८ मध्ये लीगच्या प्रारंभी सर्व आठ फ्रँचायझींचे हे एकूण मूल्य होते. आयपीएलचा १५वा सीझन २६ मार्चपासून सुरू होत आहे. लेखक बोरिया मजुमदार म्हणतात, आयपीएलने क्रिकेट पूर्ण बदलून टाकले. भारतीयांची मानसिकता व जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचेही ते सूचित करते.

आयपीएलची कल्पना २००७ मध्ये भारतीय उद्योजकतेसाठी अनुकूल अशा वेळी उदयास आली. त्या काळात फ्लिपकार्ट, तिकीट बुकिंग कंपनी रेडबस आणि टॅक्सी कंपनी ओलासारखे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जवळजवळ एकाच वेळी समोर आले होते. बीसीसीआयचे अधिकारी ललित मोदी यांनी अमेरिकन कल्पनेचे स्थानिक कल्पनेत रूपांतर करून ट्वेंटी-२० क्रिकेट टेलिव्हिजनवर सादर केले. सोनी वाहिनीने पहिल्या दहा सीझनच्या टीव्ही हक्कांसाठी ७६०० कोटी रुपये दिले होते. हा कराराच्या संपताच स्टार इंडियाने प्रसारण हक्क अडीचपट अधिक पैसे देऊन विकत घेतले.

स्पर्धेतील संमिश्र प्रेक्षकांनीही प्रायोजकांचे लक्ष वेधून घेतले आहे. २०१७ पर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या जर्सीवर मेकअप आणि स्किनकेअर ब्रँड लोटस हर्बल्सचा लोगो होता. २०२० मध्ये आयपीएलच्या टेलिव्हिजन प्रेक्षकांमध्ये महिलांचा वाटा ४३% होता. इकडे, महिला लीगची योजना पुढे गेली आहे. गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सचे भागभांडवल विकत घेणारे रेडबर्ड कॅपिटलचे भागीदार अॅलेक स्किनर म्हणतात की, आयपीएलची लोकप्रियता अमेरिकन फुटबॉल लीग, एनएफएल आणि बास्केटबॉल लीग एनबीएच्या बरोबरीने आहे.

लेखक अमित वर्मा म्हणतात, १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणानंतर मध्यमवर्गाचा व देशातील छोट्या शहरांमधून लोकांचा उदय होऊ लागला. क्रिकेटमध्येही असेच घडले. आयपीएलने हा ट्रेंड आणखी पुढे नेला. क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांनी आयपीएलसारख्या स्पर्धा सुरू केल्या आहेत. मजुमदार म्हणतात, “जगभरात आयपीएलसारख्या स्पर्धांच्या उपस्थितीमुळे उदयोन्मुख भारतामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे की, जगावर वर्चस्व गाजवणारा ब्रँड तयार करणे शक्य आहे.”

© 2019 The Economist Newspaper Limited. All rights reserved

बातम्या आणखी आहेत...