आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:औरंगाबाद फर्स्टमुळे डॅशबोर्डवर कळणार शहरातील झाडांची माहिती

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे पर्यावरण अबाधित राखण्यासाठी झाडांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे शहरात कोणत्या जातीचे झाड कुठे आहे, त्याची स्थिती, उंची काय आहे याची माहिती संकलित करण्याचे काम औरंगाबाद फर्स्टच्या पुढाकाराने होत आहे. महापालिका, स्मार्ट सिटी प्रयास फाउंडेशन आणि एमजीएम विद्यापीठ यात सहभागी आहे. ३०० विद्यार्थी या कामात योगदान देत आहेत.

दोन दिवसांत दीड तास काम करून २३१५ झाडांची नाेंदही अॅपमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे शहरातील युवक ऋषिकेश डोणगावकर यांनी बनवलेल्या ट्री सेन्सर अॅपमार्फत हे काम केले जाणार आहे, अशी माहिती उपक्रमाच्या उद्घाटन सत्रात फर्स्टचे अध्यक्ष रणजित कक्कड यांनी दिली.कक्कड म्हणाले, निसर्गाचे संतुलन राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. यामध्ये झाडांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची संख्या नगण्य आहे. वृक्षांची संख्या कमी असणे हे असमतोलाचे द्योतक आहे. त्यामुळे वृक्षांची संख्या, जात आणि ठिकाण महिती असणे ही पहिली पायरी आहे. त्यामुळे कोणत्या भागात किती आणि कोणत्या जातीची वृक्ष लागवड करावी याचा अंदाज येईल. यादृष्टीने हे अॅप महत्त्वाचे आहे. या वेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू अंकुशराव कदम, औरंगाबाद फर्स्टचे उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, माजी अध्यक्ष ऋषी बागला, मानसिंग पवार, कोशाध्यक्ष अनिल माळी उपस्थित होते.

‘औरंगाबाद ट्री सेन्सर्स’ नावाचे अॅप्लिकेशन
ऋषिकेश डोणगावकर यांनी ‘औरंगाबाद ट्री सेन्सर्स’ हे अॅप तयार केले. या अॅपद्वारे जिओ टॅग होईल. डॅशबोर्डवर खासगी आणि शासकीय जागेवर असलेल्या झाडांची माहिती मिळेल. सर्व माहिती स्मार्ट सिटीच्या सर्व्हरला जमा होईल. औरंगाबाद फर्स्टची संकल्पना, मनपाचे अॅप आणि एमजीएमचे विद्यार्थी तर प्रयास संस्था हे काम करेल.

लोकसहभागातून पहिलाच प्रकल्प
आतापर्यंत भारतात कुठेही लोकसहभागातून, विद्यार्थ्यांनी वृक्षगणना केलेली नाही. पहिल्यांदाच स्थानिक संस्थांच्या पुढाकाराने ३०० हून अधिक विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून वृक्षगणना करणार आहे. अॅपची गती पाहता सहा महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल.

बातम्या आणखी आहेत...