आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कोरोना बाधीतांची संख्या वाढू लागल्याने आता प्रत्येक गणासाठी एक समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती, तातडीने माहिती मिळण्यासाठी जिल्हा परिषदेचा फंडा

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा व तालुकास्तरवर अधिकारी नियुक्त

हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने माहिती मिळणे तसेच आवश्‍यक कार्यवाही करणे अपेक्षीत असल्याने आता जिल्हा परिषदेने प्रत्येक पंचायत समिती गणांसाठी एक समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गुरुवारी (ता. २८) काढले आहेत.

जिल्हयात मागील पंधरवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, नाशीक या भागातून येणाऱ्या मजुरांमध्येच कोरोनाचे प्रमाण अधिक असल्याचे आता पर्यंतच्या तपासणीमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार प्रत्येक गावात आलेल्या मजूरांना तसेच गावकऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातून कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्यानंतर त्याची तातडीने माहिती मिळावी तसेच आवश्‍यक उपाय योजना केल्या जाव्यात यासाठी पंचायत समिती गण निहाय १०४ समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी, नितीन दाताळ, गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिकारी काम करणार आहेत.

जिल्हा व तालुकास्तरवर अधिकारी नियुक्त

जिल्हास्तरावर जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून यु. एल, हातमोडे, तालुकास्तरावर हिंगोली सहाय्य गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, कळमनुरी ए. टी. आंधळे, सेनगाव एम. टी. कोकाटे, औंढा नागनाथ जी. के. पाटील, वसमत बी. टी. शिंदे यांची नियुक्ती केली आहे. तर १०४ गणांसाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नियुक्त केले आहेत.

समन्वय अधिकाऱ्यांची हि आहे जबाबदारी

क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील याची दक्षता घेणे, गाव पातळीवर स्वच्छता व जंतूनाशकाची फवारणी करून घेणे, आरोग्य व पंचायत विभागाच्या सर्वेक्षणाच्या बाबी पाहणे, वैद्यकिय अधिकारी, आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या संपर्कात राहून उपाय योजना करणे, कोरोना रुग्ण आढळलेल्या ठिकाणी कंन्टोनमेंट झोन नुसानर सर्वेक्षणाची पाहणी करणे. सर्व प्रकारची माहिती जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देणे.

बातम्या आणखी आहेत...