आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:क्रेडिट कार्डच्या व्यवहाराची माहिती घेत खात्यातून 5 0 हजार काढून घेतले, तक्रार देऊन 2 महिने होऊनही सायबर पोलिसांनी केला नाही तपास

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रेडिट कार्डवर केलेली खरेदी व त्यानंतर पैसे भरल्याच्या व्यवहाराची माहिती सायबर गुन्हेगारापर्यंत पोहोचल्याने एका तरुणाची ५०,५०० रुपयांची फसवणूक झाली. त्याने सायबर पोलिसांकडे याची तक्रार केली. मात्र, त्यांनी तपासासाठी दोन महिने लावले. नंतर सिटी चौक पोलिसांकडे अर्ज वर्ग केला. रमनस्तपुऱ्यात राहणारे सय्यद फय्याजुद्दीन सय्यद सज्जादुद्दीन (२५) यांचा संगणकाचा व्यवसाय असून ते नेहमीच क्रेडिट कार्डचा वापर करतात. ६ जानेवारीला त्यांना पैशाची गरज असल्याने रमनस्तपुरा येथील पटेल एंटरप्रायजेस येथून ५१ हजार २५० रुपये एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे घेतले होते. नियमाप्रमाणे क्रेडिट कार्डवरून घेतलेली रक्कम २८ दिवसांमध्ये खात्यात जमा होणे आवश्यक होती. त्याप्रमाणे २७ जानेवारीपर्यंत एकूण ५३ हजार ७३८ रुपये रक्कम भरण्यासाठी त्यांना मेसेज व एसबीआयकडून कॉल आला. घेतलेल्या रकपेक्षा अधिकची रक्कम रिफंड मिळेल, असे कॉलवरील व्यक्तीने सांगितले. २७ जानेवारी रोजी फय्याजुद्दीन यांनी एचडीएफसी बँकेतून एसबीआय क्रेडिट कार्डवर ही रक्कम पाठवली.

गुन्हेगारांना व्यवहाराविषयी कळले कसे? : फय्याजुद्दीन यांनी सर्व प्रक्रिया क्रेडिट कार्ड व बँकेद्वारे पार पाडली. तरीही त्यांच्या सर्व व्यवहाराची माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचली. २८ जानेवारी रोजी सकाळी १०.१५ वाजता अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. समाेरील महिलेने एसबीआय क्रेडिट कार्डमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे जास्तीचे भरलेले पैसे रिफंड होणार असून त्यासाठी क्रेडिट कार्डच्या शेवटचे चार अंक सांगा असे म्हणाली. त्यानुसार त्यांनी शेवटचे चार अंक सांगितले. त्यानंतर माेबाइलवर आलेला ओटीपी देखील सांगितला अन् तेथेच ते फसले. महिलेशी बोलत असतानाच एसबीआय क्रेडिट कार्ड मधून Housing.com यावर ५० हजार ५०० रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला. त्यांनी एसबीआय क्रेडिट कार्डच्या कार्यालयात जाऊन विचारपूस केल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

अज्ञात मोबाइलधारकावर गुन्हा दाखल
फय्याजुद्दीन यांनी १ फेब्रुवारी रोजी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली. मात्र, पोलिसांनी चौकशीसाठी तब्बल दोन महिने लावले. या काळात किमान माहिती मिळणे अपेक्षित असताना त्यांनी फय्याजुद्दीन यांना सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. दाेन महिने सायबर पोलिसांकडे पाठपुरावा करूनही केवळ अज्ञात मोबाइलधारकावर गुन्हा नाेंदवण्यात आला. तपास वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...