आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात सर्वश्रेष्ठ दान:रक्तपेढ्यांत महिन्याला जितके संकलन त्यापेक्षा 40 टक्के जास्त 10 दिवसांतच

औरंगाबाद / रोशनी शिंपी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवात विविध देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांची रेलचेल असते. अनेक गणेश मंडळे या दहा दिवसात सामाजिक कार्यातही मोठ्या प्रमाणावर हातभार लावतात. शहरातील अनेक गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरांचे नियोजन केले आहे. सरासरी एखाद्या महिन्याच्या १० दिवसांत शहरातील सात रक्तपेढ्यांमध्ये जितके रक्तसंकलन केले जाते त्यापेक्षा सुमारे ४० टक्के जास्त रक्त पिशव्या या शिबिरांमुळे रक्तपेढ्यांना उपलब्ध झाल्या आहेत. भंडाऱ्याच्या माध्यमातून हजारो लोकांना अन्नदानही यानिमित्ताने करण्यात आले. मनपाचे उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले, यंदा वर्षभरात २०,४०० झाडे लावण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे. पण, प्रत्यक्षात गणेशोत्सवातील मंडळांनी मनपाच्या उद्दिष्टापैकी ३० टक्क्याहून अधिक म्हणजे ७,६७५ झाडे दहा दिवसात लावली.

शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुमीत पवार म्हणाले, १०० देशी झाडांचे आम्ही वृक्षारोपण केले. १ हजार ५०० रोपे वाटप केली. याशिवाय ५ हजार तुळशी बियांचे वाटपही केले. छावणी गणेश महासंघाने ७५ झाडांचे रोपण केले, असे अध्यक्ष अशोक आमले म्हणाले. जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने ५ हजारांहून अधिक झाडे सारोळा डोंगरावर लावल्याचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार म्हणाले. शिबिरात तरुणाईसोबतच महिलांचाही उत्स्फुर्त सहभाग पाहायला मिळत असल्याचे रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...