आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींसह चौघी बुडाल्या, तिघींचा दुर्दैवी मृत्यू

बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशासनाकडून नदीकाठी न जाण्याचे आवाहन

कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघी जणी नदीत बुडाल्या. यापैकी तिघींचा मृत्यू झाला आहे, तर एकीला वाचवण्यात यश आले आहे. बीड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये आई, मुलगी आणि पुतणीचा समावेश आहे. गेवराई तालुक्यातील मिरगाव इथे ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील मीरगाव इथल्या गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी चौघीजणी गेल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक मुलगी थोडक्यात बचावली. रंजना गोडबोले (वय 30), शीतल गोडबोले(वय 10) आणि अर्चना गोडबोले(वय 10), यांचा मृतांत समावेश आहे. तर आरती गोडबोले या मुलीवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचे दिसले.

प्रशासनाकडून नदीकाठी न जाण्याचे आवाहन
दोन दिवसांच्या पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गतवर्षी झालेल्या पावसामुळे आधीच गोदावरी नदीत मुभलक पाणीसाठा आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदी काठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

नदी काठावर धोबीघाटाची मागणी
गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर अशा घटना दरवर्षी घडत आहेत. नदीला पूर आल्यानंतर नदी काठच्या लोकांना केवळ सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येतोय. मात्र अशा घटना टाळण्यासाठी नदी काठावर धोबीघाट तयार करावा जेणेकरून हकनाक निष्पाप जीव जाणार नाहीत, अशी मागणी स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी केली आहे.

इनपुट- रोहित देशपांडे

बातम्या आणखी आहेत...